Genelia Deshmukh and Riteish Deshmukh: अभिनेता रितेश देशमुखची (Riteish Deshmukh) आई वैशाली देशमुख (Vaishali Deshmukh) यांचा आज वाढदिवस आहे. वैशाली देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त रितेश आणि जिनिलिया देशमुख (Genelia Deshmukh) यांनी सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी या पोस्टच्या माध्यमातून वैशाली देशमुख यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
जिनिलियाची पोस्ट
जिनिलियानं एक फॅमिली फोटो शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, "प्रिय आई, एक पुरोगामी स्त्री कशी असते, हे मला शिकवल्याबद्दल धन्यवाद, माझ्यावर स्वत:च्या मुलीप्रमाणे प्रेम केल्याबद्दल धन्यवाद, माझी मराठी भाषा दररोज सुधारल्याबद्दल धन्यवाद. सर्वात जास्त माझी आई असल्याबद्दल धन्यवाद. आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा."
रितेशनं देखील वैशाली देशमुख यांच्यासोबतचा एक फोटो शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, "आई लव्ह यू, तू आमची लाईफ आहेस" जिनिलिया आणि रितेश यांनी शेअर केलेल्या फोटोला कमेंट करुन अनेक नेटकऱ्यांनी वैशाली देशमुख यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
जिनिलिया आणि रितेश या दोघांनी 2003 मध्ये आलेल्या तुझे मेरी कसम या चित्रपटातून पदार्पण केले. जवळपास 10 वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न केले. जिनिलिया आणि रितेश यांनी 3 फेब्रुवारी 2012 रोजी लग्नगाठ बांधली. जिनिलिया आणि रितेश यांना रियान आणि राहिल ही दोन मुलं आहेत.
काही महिन्यांपूर्वी जिनिलिया आणि रितेश यांचा वेड हा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. रितेश आणि जिनिलिया यांच्या वेड या चित्रपटानं कोट्यवधींची कमाई केली आहे. आता प्रेक्षक जिनिलिया आणि रितेश यांच्या आगामी चित्रपटांची उत्सुकतेने वाट बघत आहेत. रितेश आणि जिनिलिया हे सोशल मीडियावर विविध रिल्स शेअर करतात. त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टला नेटकऱ्यांची पसंती मिळते.
महत्त्वाच्या बातम्या :