मुंबई : अभिनेता इम्रान हाश्मी 'सीरियल किसर' म्हणून बॉलिवूडमध्ये ओळखला जातो. त्याने बऱ्याच सिनेमात अनेक अभिनेत्रींसोबत इंटिमेट सीन दिले आहेत. नुकतीच त्याला आलिया भटसोबत काम करण्याची ऑफर मिळाली होती. मात्र त्याने हा चित्रपट नाकारला.
हा सिनेमा रॉमँटिक-कॉमेडी असून आलियासोबच रोमँटिक भूमिका करण्यास इम्रानला अजिबात इंटरेस्ट नाही. इम्रान आणि आलियामध्ये काहीच आलबेल नसल्याने त्याने हा सिनेमा नाकारला असावा, असा विचार तुम्ही करत असाल तर तो चुकीचा आहे.
हा सिनेमा नाकारण्यामागचं कारण म्हणजे आलिया आणि इम्रान हे चुलत भाऊ-बहिण आहे. त्यामुळे या सिनेमाच रोमँटिक भूमिका साकारणं दोघांसाठी अतिशय ऑकवर्ड होईल. इतकंच नाही तर इम्रान सिनेमाच्या निर्माता-दिग्दर्शकावर नाराज असल्याचं समजतं. या भूमिकांसाठी आम्हा दोघांचा विचार कसा काय करु शकतात, असं इम्रानचं मत आहे.
"मला आलियासोबत काम करायला आवडेल. पण तिच्यासोबच ऑनस्क्रीन रोमान्स करणार नाही," असं इम्रानने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केलं.