Vicky Kaushal: अभिनेत्री कतरिना कैफच्या (Katrina Kaif) 'टायगर 3' (Tiger 3) या चित्रपटामधील टॉवेल सीनची चर्चा सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. हा फाईट सीन प्रेक्षकांना खूप आवडला. आता या ‘टॉवेल फाईट’ सीनवर कतरिनाचा पती विकी कौशलनं (Vicky Kaushal) प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाला विकी? (Vicky Kaushal On Katrina Kaif Towel Action Sequence)
एका मुलाखतीमध्ये विकीला कतरिनाच्या टायगर-3 चित्रपटामधील ‘टॉवेल फाईट’ सीनबाबत विचारण्यात आलं. यावेळी विकी म्हणाला, "मी चित्रपटाच्या स्क्रिनिंगसाठी गेलो होतो आणि आम्ही दोघे चित्रपट पाहत होतो. साहजिकच जेव्हा हा सीन आला तेव्हा तो सीन बघतनाता मी तिच्याकडे झुकलो आणि म्हणालो, मी तुझ्याशी पुन्हा कधीच वाद घालणार नाही. कारण टॉवेल घालून तू मला असे मारावे, असे मला वाटत नाही."
पुढे विकी म्हणाला, "तिने घेतलेल्या कठोर परिश्रमांचा मला खरोखर अभिमान वाटतो. तिचे काम पाहणे खूप प्रेरणादायी आहे."
टायगर 3 ला मिळाली प्रेक्षकांची पसंती
कतरिनाच्या टायगर 3 या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. ओपनिंग-डेला या चित्रपटानं 44.5 कोटींची कमाई केली. या चित्रपटात कतरिनासोबतच सलमान खान आणि इमरान हाशमी यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. मनीष शर्माने (Manish Sharma) या चित्रपटाची दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.शाहरुख खान आणि हृतिक रोशन यांचा कॅमिओ देखील चित्रपटात आहे.
विकीचे आगामी चित्रपट (Vicky Kaushal Upcoming Movie)
विकी हा सध्या त्याच्या 'सॅम बहादूर' या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट 1 डिसेंबरला थिएटरमध्ये रिलीज होण्यासाठी सज्ज आहे. विक्की कौशल व्यतिरिक्त नीरज काबी, एडवर्ड सोनेनब्लिक, रिचर्ड भक्ती क्लेन, साकिब अयुब आणि कृष्णकांत सिंह बुंदेला हे कलाकार देखील या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटात विकी हा फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. तर सान्या मल्होत्रानं या चित्रपटात सॅम माणेकशॉ यांच्या पत्नी सिल्लू माणेकशॉ यांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात फातिमा सना शेखनं इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: