Tiger 3 Katrina Kaif Fight Scene: अभिनेता सलमान खानचा (Salman Khan)  'टायगर 3' (Tiger 3) हा  बहुप्रतिक्षित चित्रपट यंदा दिवाळीला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरमध्ये सलमान खान आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) यांचे काही अॅक्शन सीन्स दिसले. ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलेला कतरिनाच्या 'टॉवेल फाईट' या सीनची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. या सीनमध्ये कतरिना एका अभिनेत्रीसोबत फाईट करताना दिसत आहे. जाणून घेऊयात या अभिनेत्रीबद्दल...


टायगर-3 या चित्रपटाच्या ट्रेलरमधील एका सीनमध्ये कतरिना कैफ ही  एका मुलीसोबत 'टॉवेल फाईट' करताना दिसली. कतरिना ज्या अभिनेत्रीसोबत टॉवेल फाईट करत आहे, ती अभिनेत्री  'ब्लॅक विडो' फेम मिशेल ली आहे. जी अॅक्शन लेडीच्या नावानेही प्रसिद्ध आहे.


मिशेल ली ही अभिनेत्रीसोबतच एक मार्शल आर्टिस्ट आणि स्टंट वुमन देखील आहे. मिशेल ली ही एका मुलाची आई देखील आहे.  ती फिटनेकडे विशेष लक्ष देते . मिशेल ली 'टायगर 3' मधून बॉलिवूडमध्ये धमाकेदार एन्ट्री करणार असल्याचे बोलले जात आहे.   या चित्रपटात मिशेल लीचा केवळ  एकाच सीन असणार आहे, असं म्हटलं जात आहे. पण टायगर-3 या चित्रपटाच्या ट्रेलरमधील मिशेल ली आणि कतरिनाच्या  'टॉवेल फाईट'नं मात्र अनेकांचे लक्ष वेधले आहे.



'टायगर 3'  इमरान हाश्मी, सलमान खान आणि कतरिना कैफ हे कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत. 'टायगर 3' हा चित्रपट यंदा दिवाळीला 12 नोव्हेंबर रोजी थिएटरमध्ये येणार आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगु भाषेत प्रदर्शित होणार आहे.






 'एक था टायगर', 'टायगर जिंदा है', 'वार' आणि 'पठाण'  या चित्रपटानंतर आता  YRF च्या स्पाय युनिव्हर्समधील 'टायगर 3' हा पाचवा चित्रपट   प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे. सलमान आणि कतरिना यांचा 'एक था टायगर' हा चित्रपट  2012मध्ये रिलीज झाला होता.  त्यानंतर 2017 मध्ये 'टायगर जिंदा है' रिलीज झाला होता. आता  सलमानच्या टायगर-3 हा चित्रपट रिलीज होत आहे.


इतर महत्वाच्या बातम्या:


Tiger 3 Trailer Out: टायगर आणि जोया अॅक्शन मोडमध्ये; टायगर-3 चा धमाकेदार ट्रेलर रिलीज; सलमान, कतरिना आणि इमरान हाश्मीचा जबरदस्त लूक