Vicky Kaushal Song Kanhaiya Twitter Pe Aaja: अभिनेता विकी कौशलचा (Vicky Kaushal) 'द ग्रेट इंडियन फॅमिली' (The Great Indian Family) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. विकीच्या या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.  'द ग्रेट इंडियन फॅमिली' या चित्रपटामधील  'कन्हैया ट्विटर पे आजा' (Kanhaiya Twitter Pe Aaja)  हे गाणं नुकतेच रिलीज झाले आहे. हे गाणं रिलीज होताच अनेक नेटकऱ्यांनी या गाण्याला ट्रोल केलं आहे.


'कन्हैया ट्विटर पे आजा'  हे गाणं प्रीतमने संगीतबद्ध केले आहे आणि नकाश अझीझने गायले आहे. या  गाण्याचे नृत्यदिग्दर्शन विजय ए गांगुली यांनी केले आहे. अमिताभ भट्टाचार्य हे या गाण्याचे गीतकार आहेत. 


नुकताच विकी कौशलनं 'कन्हैया ट्विटर पे आजा'  या गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. अनेक नेटकऱ्यांनी या व्हिडीओला कमेंट करुन या गाण्याला ट्रोल केलं आहे. एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'असे गाणे लिहिण्यामागील हेतू काय आहे हे मला माहित नाही' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'कसे लिरिक्स लिहिले आहेत भाई, शेम ऑन यू.'








'कन्हैया ट्विटर पे आजा'  हे गाणं शेअर करुन विकीनं कॅप्शनमध्ये लिहिलंस 'भजन कुमार अॅट यूअर द्वार!'. विकीचा द ग्रेट इंडियन फॅमिली हा चित्रपट ट 22 सप्टेंबरला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटात विकीसोबतच  मानुषी छिल्लर (Manushi Chhillar)  देखील प्रमुख भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विजय कृष्ण आचार्य यांनी केले आहे.


 उरी, मसान, राझी, संजू, सरदार उधम, मनमर्जियां, जरा हटके जरा बचके,  गोविंदा नाम मेरा  या चित्रपटांमधून विकी प्रेक्षकांच्या भेटीस आला. विकी त्याच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकतो. आता द ग्रेट इंडियन फॅमिली या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी विकी सज्ज झाला आहे. विकीच्या हा आगामी चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करेल की नाही? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.


संबंधित बातम्या


The Great Indian Family Release Date: द ग्रेट इंडियन फॅमिली 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीस; विकी कौशल आणि मानुषी छिल्लर प्रमुख भूमिकेत