हरलीनने इन्स्टाग्रामवर विकीसोबत फोटो शेअर केला आहे. यामध्ये दोघं एकाच रंगाचे स्वेटशर्ट घातलेले दिसत आहेत. 'हाऊज द जोश' असं या टीशर्टवर लिहिलं आहे. 'हाय सर!' असं कॅप्शन हरलीनने या फोटोला दिलं आहे. विकीच्या 'उरी' चित्रपटातला हा संवाद सोशल मीडियावर गाजत आहे.
हरलीन सेठीने यापूर्वी काही जाहिरातींमध्ये काम केलं आहे. 'अल्टबालाजी'च्या 'ब्रोकन बट ब्यूटिफूल' या वेब सीरिजमध्येही हरलीन विक्रांत मस्सीसोबत झळकली होती.
विकीने आपल्या रिलेशनशीपबाबत कधीच कबुली दिली नाही. मात्र 'कॉफी विथ करण'मध्ये त्याने आपण सिंगल नसल्याचं सांगितलं होतं. 'नव्याने रिलेशनशीपमध्ये अडकलो असून हे नातं आम्ही गांभीर्याने घेतलं आहे' असं विकी म्हणाला होता.
अमृतपाल सिंह या मित्राच्या पार्टीत विकी हरलीनला भेटला होता. विकीवर क्रश असलेली एक तरुणी त्याला भेटायला या पार्टीत आली होती. मात्र विकीचं कनेक्शन हरलीनशी जुळल्याचं म्हटलं जातं.