'इंडियाज गॉट टॅलेंट 8' मुळे दीपक कलाल प्रसिद्धीझोतात आला होता. त्यानंतर राखी सावंतसोबत लाईव्ह लग्न आणि हनिमून करण्याच्या चर्चांमुळे दीपकबाबत नेटिझन्समध्ये उत्सुकता होती.
रॅपर फझीलपुरियाचा मॅनेजर असल्याचं सांगणाऱ्या दीपक नंदालने मारहाण केल्याची माहिती आहे. विनोदाच्या नावाखाली जो बाष्फळपणा सुरु आहे, त्याबद्दल नेटिझन्सची माफी मागण्यास नंदालने दटावलं. त्यानंतर दीपक कलाल हात जोडून माफी मागतानाही व्हिडिओमध्ये दिसत आहे.
खुद्द दीपक कलालनेच हा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला आहे. काही मिनिटांतच वायरल झालेल्या या व्हिडिओचा नेटिझन्सनी समाचार घेतला आहे. काही जणांनी हा पब्लिसिटी स्टंट असल्याचंही म्हटलं आहे.