Tiku Talsania Health Update : प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते टीकू तलसानिया यांना तीव्र ह्रदयविकाराचा झटका आल्याची माहिती समोर आली आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अभिनेते टीकू तलसानिया यांनी त्यांच्या कॉमेडीने प्रेक्षकांना खळखळून हसवलं आहे. त्यांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये आमिर खान, अजय देवगण यांसारख्या कलाकारांसोबत कामही केलं आहे. अभिनेते टीकू तलसानिया यांनी हिंदी आण गुजराती चित्रपटांमध्ये काम केलं आहे.


प्रसिद्ध अभिनेत्याला ह्रदयविकाराचा झटका 


अभिनेते टीकू तलसानिया यांना शनिवारी, 11 जानेवारी 2024 रोजी सकाळी हार्ट अटॅक आल्याची माहिती आहे. टीकू तलसानिया सध्या 70 वर्षाचे आहेत. ह्रदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक आहे. मीडिया रिपोर्टनुसार,सध्या त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं आहे. 


अभिनेत्याची प्रकृती गंभीर, तातडीनं रुग्णालयात दाखल


ज्येष्ठ अभिनेते टिकू तलसानिया यांच्याबद्दल मोठी बातमी समोर आली आहे. टिकू तलसानिया यांना  हृदयविकाराचा झटका आला असून त्यांना मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. टेली चक्करच्या रिपोर्टनुसार, अभिनेते टिकू तलसानिया यांची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान, त्यांच्या प्रकृतीबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.


देवदास, इश्क, जोडी नंबर 1 यासारख्या चित्रपटांमध्ये काम


टिकू तलसानिया हे चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध नाव आहे. त्यांनी देवदास, जोडी नंबर 1, शक्तीमान, कुली नंबर 1, राजा हिंदुस्तानी, दरार, जुडवा, प्यार किया तो डरना क्या, राजू चाचा, मेला, अखियों से गोली मारे, हंगामा, ढोल, धमाल, स्पेशल 26 अशा शेकडो चित्रपटांमध्ये काम केले. आहे.






महत्त्वाच्या इतर बातम्या :


वडील हिंदू मात्र 'ही' अभिनेत्री पाळते इस्लाम धर्म, 26 वर्षांनी मोठ्या आमिर खानसोबत अफेअरची चर्चा