मुंबई : बॉलिवूडमधील दिग्गज कलाकार कादर खान यांची प्रकृत्ती खालावल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. कादर खान गेल्या अनेक वर्षांपासून आपला मुलगा सरफराज आणि सून शाईस्तासोबत कॅनडामध्ये राहत आहेत. मात्र प्रकृत्ती खालावल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे.
प्रोग्रेसिव सुप्रान्यूक्लियर पाल्सी डिसऑर्डर या आजारामुळे 81 वर्षीय कादर खान यांचा मेंदूने काम करणं बंद झालं आहे. कादर खान यांना मुलगा सरफराजने ही माहिती दिली आहे. डॉक्टर त्यांच्या तब्येतची काळजी घेत आहेत. मात्र श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे.
गेल्या वर्षी कादर खान यांच्या गुडघ्याची शस्त्रक्रिया करण्यात आली होती, त्यामुळे त्यांना चालणंही कठीण झालं होतं. चालल्यास आपण खाली पडू याची भीती कादर खान यांना वाटत होती. त्यानंतर सातत्यानं त्यांची प्रकृती खालावत गेली.
कादर खान यांनी डाग या चित्रपटापासून त्यांच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. 43 वर्षांच्या सिनेकारकीर्दित त्यांनी 300 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं. तसेच 250 हून अधिक सिनेमांचे संवाद त्यांनी लिहिले. 2015 मध्ये आलेल्या 'दिमाग का दही' सिनेमात ते दिसले होते.
अभिनेते कादर खान यांची प्रकृती खालावली
Pravin Wakchaure
Updated at:
28 Dec 2018 11:36 AM (IST)
प्रोग्रेसिव सुप्रान्यूक्लियर पाल्सी डिसऑर्डर या आजारामुळे 81 वर्षीय कादर खान यांचा मेंदूने काम करणं बंद झालं आहे. कादर खान यांना मुलगा सरफराजने ही माहिती दिली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -