मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शर्वरी वाघ हिच्यासाठी यंदाचं वर्ष खूप खास ठरलं आहे. अभिनेत्री शर्वरी वाघच्या मुंज्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 100 कोटींची कमाई आहे. या चित्रपटातील 'तरस' या गाण्यालाही प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली. हे गाणं ट्रेंडमध्ये पाहायला मिळालं. मुंज्यासारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटासह शर्वरीचा 'महाराज' चित्रपटही हिट ठरला. जुनैद खान आणि शर्वरी यांचा हा चित्रपट प्रेक्षकांसह समीक्षकांनाही आवडला. यासोबत 'वेदा' चित्रपटामधील तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी तिने खूप प्रशंसा मिळवली आहे.
अल्फा चित्रपटामध्ये शर्वरी वाघ महत्त्वाच्या भूमिकेत
या वर्षात एकामागून एक बॉल्कबस्टर चित्रपट देणारी अभिनेत्री शर्वरी वाघ लवकर स्पाय युनिव्हर्सचा एक भाग होणार आहे. शर्वरी वाघ यशराज फिल्म्सच्या अल्फा या चित्रपटाच झळकणार आहे. अल्फा चित्रपटाची टीम लवरकपत दुसऱ्या शुटींग शेड्यूलसाठी काश्मीरला रवाना होणार आहेत. चित्रपटाची शूटिंग काश्मीरच्या सुंदर खोऱ्यात होणार आहे. अल्फा चित्रपटाच्या शूटिंगसाठी काश्मीरला जाण्याची खूप उत्सुक असल्याचं अभिनेत्री शर्वरी वाघने सांगितलं आहे.
आलिया भटसोबत स्क्रिन शेअर करणार
अल्फा चित्रपटाच्या सेटवर पुन्हा जाण्यासाठी खूप उत्सुक
अभिनेत्री शर्वरी वाघ मोठ्या ॲक्शन एंटरटेनर अल्फा चित्रपटामध्ये महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. अल्फा चित्रपटामध्ये शर्वरी सुपरस्टार अभिनेत्री आलिया भट्टसोबत दिसणार आहे. अल्फा चित्रपटाची टीम सदस्य दुसऱ्या शेड्यूलच्या शूटिंगसाठी काश्मीरला जात आहेत आणि 26 ऑगस्टपासून काश्मीर खोऱ्यात चित्रपटाचं शूटिंग सुरू होणार आहे. याबद्दल प्रतिक्रिया देताना शर्वरी वाघ म्हणाली की, "मी अल्फा चित्रपटाच्या सेटवर पुन्हा जाण्यासाठी खूप उत्सुक असून याची आतुरतेने वाट बघत आहे. हे शेड्यूल खूपच रोमांचक असणार आहे. अल्फा चित्रपटाची टीम काही काळानंतर पुन्हा भेटत आहे, त्यामुळे आम्ही सर्वजण काश्मीर शेड्यूलसाठी पूर्णपणे सज्ज आहोत."
"सर्वकाही शिकण्याचा आणि स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न"
शर्वरी पुढे सांगितलं की, "जेव्हा मी चित्रपटाच्या सेटवर असते, तेव्हा मी एकदम चॉकलेटच्या दुकानातील एका मुलासारखी उत्साही असते आणि अल्फाच्या सेटवर, मी खूप उत्साही असते. सर्वकाही शिकण्याचा आणि स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करते. करिअरच्या सुरुवातीलाच अशी संधी मिळणे खरोखरच एक आशीर्वाद आहे. बॉलिवूडमधील मेगास्टार्सचा सहभाग असलेल्या अशा फ्रँचायझीचा भाग असल्यामुळे मी आनंदी आहे."