Varun Dhawan Natasha Dalal Video : बॉलिवूड अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) आणि फॅशन डिझायनर नताशा दलाल (Natasha Dalal) जानेवारी 2021 मध्ये लग्नबंधनात अडकले. दोघेही अनेकदा एकत्र स्पॉट होतात. दोघांचे फोटोदेखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशातच आता त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्या व्हिडीओमुळे वरुण आणि नताशाच्या घरी छोट्या पाहुण्याचं आगमन होणार असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली आहे. 


वरुण धवन आणि नताशा दलालवर शुभेच्छांचा वर्षाव


सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये वरुण आणि नताशा एकत्र चालताना दिसत आहेत. फर्टिलिटी क्लिनिकच्या बाहेर दोघांना स्पॉट करण्यात आले आहे. त्यामुळे नताशाकडे गोड बातमी असल्याची चर्चा रंगली आहे. चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून वरुण आणि नताशाला शुभेच्छा देत आहेत. या व्हिडीओवर अॅडव्हान्समध्ये शुभेच्छा, दोघांनाही खूप-खूप शुभेच्छा, बाळाच्या आई-बाबांना शुभेच्छा", अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. 






वरुणला सलमानने दिल्या खास शुभेच्छा!


वरुण धवन नोव्हेंबर महिन्यात त्याच्या 'भेडिया' या सिनेमाच्या प्रमोशनसाठी बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या (Salman Khan)  'बिग बॉस' (Bigg Boss) या कार्यक्रमात हजेरी लावली होती. या कार्यक्रमादरम्यान सलमानने वरुणच्या हातात एक खेळणं दिलं आणि म्हणाला,"हे तुमच्या लेकासाठी आहे". यावर वरुण म्हणाला,"अद्याप बाळ झालेलं नाही". त्यावर सलमान म्हणाला,"हे आलं आहे तर बाळदेखील येईलच". 


मीडिया रिपोर्टनुसार, वरुण धवन आणि नताशा दलाल फर्टिलिटी क्लिनिकला नव्हे तर डर्मेट क्लिनिकला गेले होते. एका स्किन स्पेशलिस्टची भेट घेण्यासाठी वरुण आणि नताशा डर्मेट क्लिनिकला गेले होते. वरुण धवन आणि नताशा दलालने अद्याप बाळाबद्दल भाष्य केलेलं नाही.


वरुण धवनचे आगामी सिनेमे (Varun Dhawan Upcoming Movies) 


वरुण धवनचा 'भेडिया' हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमात तो क्रिती सेननेसोबत झळकला होता. वरुणचा आता 'बवाल' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात तो जान्हवी कपूरसोबत झळकणार आहे. 


संबंधित बातम्या


Varun Dhawan : हॉलिवूड अभिनेत्रीला स्टेजवर केलं किस; वरुण धवनचं स्पष्टीकरण; म्हणाला...