- सुलतानः 36.54 कोटी
- फॅनः 19.20 कोटी
- हाऊसफुल 3: 15.21 कोटी
- एअरलिफ्टः 12.35 कोटी
- बागीः 11.94 कोटी
- ढिशूमः 11.05 कोटी
- उडता पंजाबः 10.05 कोटी
'ढिशूम'ची जबरदस्त ओपनिंग तरीही वरुण धवन नाराज
एबीपी माझा वेब टीम | 30 Jul 2016 12:30 PM (IST)
मुंबईः अभिनेता वरुण धवन आणि जॉन अब्राहम यांच्या 'ढिशूम' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली ओपनिंग केली आहे. मात्र असं असूनही पाकिस्तानमध्ये सिनेमाला बंदी घातल्यामुळे वरुण धवन नाराज आहे. त्याने जाहीरपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे. https://twitter.com/Varun_dvn/status/759222200985608196 'ढिशूम' सिनेमाने पहिल्या दिवशी भारतात 11 कोटींची कमाई केली आहे. या वर्षात एवढी ओपनिंग मिळवणारा हा सहावा सिनेमा ठरला आहे. मात्र पाकिस्तानमध्ये चुकीच्या कारणावरुन सिनेमावर बंदी घालण्यात आली आहे. पाकिस्तानचा हा निर्णय अत्यंत चुकीचा आहे. सिनेमात पाकिस्तानविषयी चुकीचा संदेश जाईल, असं काहीही नाही, अशा शब्दात वरुण धवनने आपली नाराजी व्यक्त केली आहे. या वर्षात चांगली ओपनिंग मिळवणारे सिनेमे