Utkarsh Shinde : 'सनी' हा मराठी सिनेमा गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पण या सिनेमाचे शो रद्द करण्यात आले आहेत. मराठी सिनेमाच्या सुरू असलेल्या गळचेपीवर मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकार भाष्य करत आहेत. आता अभिनेता आणि गायक उत्कर्ष शिंदेने (Utkarsh Shinde) या प्रकरणावर रोखठोक भाष्य केलं आहे.
सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत उत्कर्षने लिहिलं आहे,"आज मराठी सिनेमाला बर्बरतेतून समृद्धीच्या वाटेवर आणायचं असेल तर समानतेची वागणूक मिळायला हवी. अद्वितीय महान कलाकार दादा कोंडके यांच्या चित्रपटांना त्याकाळी सिनेमागृह मिळाली नव्हती. तेव्हाही मराठी सिनेमांची गळचेपी होत होती. तोच प्रश्न, तिच वेळ, तेच विचार, तिचं कुचंबणा, तिच डावलण्याची मानसिकता आजही तोंड वर काढत आहे".
त्याने पुढे लिहिलं आहे,"उत्कर्षनं पुढे लिहिलंय, 'मराठी चित्रपट बनवताना किती कष्टाने सर्व जण आपलं सर्व काही झोकून देत उत्तम चित्रपट तयार करायचा प्रयत्न करत आहेत. पण अंततः प्रदर्शनास हक्काचे चित्रपटगृह, मुबलक वेळ, स्क्रीन्स का महाराष्ट्रातचं मराठी चित्रपटांना दिली जात नाही?"
उत्कर्षने पुढे आवाहन केलं आहे,"एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ' या ओळी फक्त बोलण्यापुरत्या नसाव्यात. किमान एकमेकांसाठी उभे राहूया. एकमेकांचा आवाज बनूया, सोबतीने संघटीत होत आपले हक्क मिळवूया".
उत्कर्षचे आगामी प्रोजेक्ट -
उत्कर्ष शिंदे सध्या 'ज्ञानेश्वर माऊली' या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत तो संत चोखामेळांची भूमिका साकारत आहे. या मालिकेच्या माध्यमातून त्याने मालिका विश्वात पदार्पण केलं आहे. त्याचा 'वेडात मराठे वीर दौडले सात' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
संबंधित बातम्या