Urvashi Rautela Dating Rumours : अभिनेत्री उर्वशी रौतेला तिच्या प्रोफेशनल लाईफपेक्षा तिचा फॅशन सेन्स आणि पर्सनल लाईफमुळे जास्त चर्चेत असते. उर्वशी रौतेला फॅशन आयकॉन आहे, तिचा स्टायलिश लूक कायम चर्चेत असतो. उर्वशी तिच्या स्टायलिश लूकमुळे सर्वांचं लक्ष वेधून घेते. उर्वशी रौतेलाचे देश-विदेशात लाखो चाहते आहेत. हे चाहते तिच्याबद्दल जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक असतात. उर्वशी तिच्या स्टाईलसोबतच तिच्या डेटींग लाईफमुळेही चर्चेत असते. उर्वशीच्या डेटींग लाईफबद्दल नेहमीच अफवा उडतात. पण, उर्वशीच्या मनात कोण आहे, हे अनेकांना माहित नाही. आता खुद्द उर्वशीनेच याचा खुलासा केला आहे.
'या' खेळाडूंना डेट करण्याची उर्वशी रौतेलाची इच्छा
अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) अनेक चाहते आहेत, ही सुंदरी नेमकी कुणासाठी वेडी आहे आणि तिला कोणाला डेट करायचं आहे, याबाबत तिने सांगितलं आहे. एका मुलाखतीत उर्वशीने तिच्या मनातील भावना व्यक्त केल्य आहेत. एका मुलाखतीदरम्यान उर्वशीला विचारण्यात आलं की, तिला कोणाला डेट करायला आवडेल. त्यानंतर तिने दिलेल्या या उत्तराने चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. उर्वशी रौतेला हिला कोणताही अभिनेता नाही, तर स्पोर्ट्समनला डेट करायचं आहे.
उर्वशी रौतेलाला 'या' दोन फुटबॉलपटूंना डेट करायचंय
उर्वशी रौतेला हिला कोणत्याही अभिनेत्याला नाही, तर फुटबॉलरला डेट करायचं आहे आणि तेही एक नाही तर दोन फुलबॉलपटूंना डेट करण्याची तिची इच्छा आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, उर्वशी रौतेला डेटींगबाबत बोलताना सांगितलं की, तिला दिग्गज फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी यांच्यासोबत लव्ह ट्रायँगलमध्ये राहायचे आहे. रोनाल्डो आणि मेस्सी हे दोघेही फुटबॉल जगतातील दोन मोठी नावे आहेत. उर्वशीने तिच्या विनोदी शैलीत डेटींग लाईफबद्दल म्हटलं की, तिला फुटबॉल खेळाडूंसोबत लव्ह ट्रायँगलमध्ये राहायला आवडेल.
उर्वशीचे मजेशीर उत्तर सोशल मीडियावर चर्चेत
एका मुलाखतीदरम्यान उर्वशीला विचारण्यात आले की तिला बॉलिवूडमध्ये कोणासोबत लव्ह ट्रायँगलमध्या राहायला आवडेल. यावेळी, उर्वशीने कोणत्याही बॉलिवूड अभिनेत्याचे नाव न घेता फुटबॉलपटूंची नावं घेतली. ती म्हणाली, "मला ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी यांच्यासोबत लव्ह ट्रायँगल राहायला आवडेल. उर्वशीचं हे मजेदार उत्तर सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरताना दिसत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :