Urvashi Rautela on Rishabh Pant : अभिनेत्री उर्वशी रौतेला आणि क्रिकेटपटू ऋषभ पंत यांचं नाव अनेकदा एकत्र जोडलं जातं. अनेकदा या दोघांच्या अफेअरच्या अफवा पसरवल्या जातात. अभिनेत्री उर्वशी रौतेलाने एकदा खुलासा केला होता की, ती ऋषभ पंतच्या संपर्कात होती. यावेळी हा चर्चेचा मुद्दा बनला होता. यानंतर वैयक्तिक बाबींचा खुलासा केल्यामुळे ऋषभ पंत संतापला होता. उर्वशीने प्रसिद्धी मिळवण्यासाठी असं केल्याचा आरोप त्याने केला होता. दोघांनीही एकमेकांवर न घेता बऱ्याच वेळा टीका केली. आता आयपीएल 2025 च्या लिलावात ऋषभ पंत सर्वात महागडा खेळाडू ठरल्यानंतर उवर्षी रौतेलाची क्रिप्टिक पोस्ट व्हायरल होत आहे.
ऋषभ पंत IPL च्या इतिहासातील महागडा खेळाडू
आयपीएल 2025 चा मेगा लिलाव नुकताच पार पडला आहे. या लिलावात ऋषभ पंत आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. सोशल मीडियावर त्याच्यावर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत असताना उर्वशी रौतेलाची पोस्ट चर्चेत आहे. ऋषभ पंतवर आयपीएल 2025 साठी सर्वाधिक बोली लागली असताना नेटिझन्सचं लक्ष अभिनेत्री उवर्षी रौतेलाच्या पोस्टकडे वेधलं गेलं आहे. उर्वशी रौतेलाने देखील एक क्रिप्टिक पोस्ट केली. उर्वशीची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे.
उर्वशीच्या पोस्टचं ऋषभसोबत कनेक्शन?
आयपीएल 2025 च्या मेगा लिलावादरम्यान ऋषभ पंतला सर्वाधिक किमतीची बोली लागली. यानंतर अभिनेत्री उर्वशी रौतेलाने देखील सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, या पोस्टचा संबंध चाहते ऋषभ पंतशी जोडत आहेत. अभिनेत्री उर्वशी रौतेलाने एकदा ऋषभ पंतसोबत अफेअर असल्याचे संकेत दिले होते. त्यामुळेच अनेकदा उर्वशी रौतेलाच्या पोस्ट आणि प्रतिक्रियांचं कनेक्सन ऋषभ पंतशी जोडलं जातं. आताही उर्वशीच्या पोस्टचं कनेक्शन ऋषभ पंतसोबत असल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे.
उर्वशी रौतेलाच्या पोस्टने वेधलं लक्ष
ऋषभ पंतला आयपीएल लिलावात 'लखनऊ सुपर जायंट' संघाने 27 कोटी रुपयांना खरेदी केल्याची बातमी समोर येताच तो गुगलवर ट्रेंड करू लागला. त्याचदरम्यान उर्वशी रौतेलानेही तिचे काही सुंदर फोटो शेअर करत एक पोस्ट केली होती. या पोस्टला तिने कॅप्शनमध्ये लिहिलं होतं की, 'मी जे बोलते, तेच होतं.' कमेंट सेक्शनमध्ये ऋषभचे नाव घेऊन नेटकरी तिला चिडवत आहेत. ऋषभ पंत आयपीएलच्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.
उर्वशी रौतेला-ऋषभ पंतच्या अफेअरची चर्चा
उर्वशी रौतेला ऋषभ पंतसोबतच्या लिंकअपमुळे अनेकदा चर्चेत असते. अभिनेत्री उर्वशी रौतेलाने 2022 मध्ये सांगितलं होतं की, कुणीतरी 'आरपी' तासनतास तिची वाट पाहत होता. लोकांनी त्याचा अर्थ RP म्हणजे ऋषभ पंत असा काढला. उर्वशीने प्रेम आणि हार्टब्रेकवर एक पोस्ट देखील केली होती. ऋषभ पंत सामना खेळण्यासाठी पोहोचला होता, तेव्हा ती ऑस्ट्रेलियातही होती. यामुळेच अनेकदा त्यांच्या अफेअरची चर्चा सोशल मीडियावर रंगते.
महत्त्वाच्या इतर बातम्या :