Pushpa 2 The Rule Box Office Collection : साऊथ इंडस्ट्रीमधील आयकॉन स्टार अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2 द रूल' चित्रपट लवकरच मोठ्या पडद्यावर रिलीज होणार आहे. या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. 'पुष्पा 2' चित्रपट रिलीज होण्यासाठी अजून 10 दिवस बाकी आहेत, याआधीच चित्रपटाने कमाईच्या बाबतीत नवा विक्रम करत शाहरुख खानच्या 'जवान' आणि 'आरआरआर' चित्रपटाला मागे टाकलं आहे.  पुष्पा 2 द रूल' चित्रपटाने  रिलीजच्या 10 दिवस आधीच कमाईचा नवा रेकॉर्ड केला आहे. पुष्पा 2 द रुल हा 2024 या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपट असून हा आतापर्यंतचे सर्व बॉक्स ऑफिस रेकॉर्ड तोडण्यासाठी सज्ज आहे.


'पुष्पा 2' कमाईचा नवा विक्रम रचण्यास सज्ज


ट्रेड ट्रॅकर वेंकी बॉक्स ऑफिसने सोमवारी चित्रपटाच्या यूएस प्रीमियरसाठीचं प्री-बुकिंग कलेक्शन शेअर केलं आहे. ट्रेड ट्रॅकर वेंकीच्या रिपोर्टनुसार, 'पुष्पा 2 द रुल' चित्रपटानं रिलीज आधीच कोट्यवधींचा गल्ला जमवला आहे. पुष्पा 2 चित्रपटाने प्री-बुकींगमध्ये 11 कोटींहून अधिक कलेक्शन केलं आहे. रविवारी संध्याकाळपर्यंत, 'पुष्पा 2' ची यूएसमध्ये 50,000 पेक्षा जास्त तिकिटे विकली गेली. उत्तर अमेरिकेत  या चित्रपटाने$1.458 दशलक्ष म्हणजेच सुमारे 12 कोटी रुपये   प्री-बुकिंग कलेक्शनचा विक्रमी टप्पा ओलांडला आहे.


शाहरुख खानच्या 'जवान'सह 'या चित्रपटांना टाकलं मागे


व्यापार विश्लेषकांनी दिलेल्या माहितीनुसार, पुष्पा 2 द रुल चित्रपटाने प्रदर्शित होण्याच्या 10 दिवस आधी 1.5 दशलक्ष डॉलरला टप्पा ओलांडला आहे. यामुळे पुष्पा 2 चित्रपटाने एसएस राजामौलीचा 'RRR' आणि शाहरुख खानच्या 'जवान' या चित्रपटांना मागे टाकलं आहे. 'RRR' आणि 'जवान' हे अमेरिकेत सर्वाधिक कमाई करणारे हे दोन भारतीय चित्रपट आहेत. या दोन्ही चित्रपटांनी उत्तर अमेरिकेत $15 दशलक्ष पेक्षा जास्त कमाई केली होती आणि आशिया खंडात सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप पाच भारतीय चित्रपटांमध्येही या चित्रपटांचा समावेळ आहे. पण, आता अमेरिकेत सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाचा रेकॉर्ड पुष्पा 2 चित्रपटाने रिलीज आधीच मोडला आहे.




पुष्पा 2 'या' दिवशी प्रदर्शित होणार 


आम्ही तुम्हाला सांगतो, 'पुष्पा 2 : द रुल' चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सुकुमार यांच्या खांद्यावर आहे. 'पुष्पा 2 : द राइज' चित्रपट 2021 मध्ये आलेल्या 'पुष्पा : द राइज' या चित्रपटाचा  सीक्वेल आहे. यामध्ये अल्लू अर्जुनला मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात फहद फासिल खलनायकाच्या भूमिकेत असून रश्मिका मंदान्ना मुख्य भुमिकेत आहे. 'पुष्पा 2 : द राइज' चित्रपट 5 डिसेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार असून याकडे चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


34 कोटींचं बजेट अन् 486 कोटींची कमाई, सस्पेन्स-थ्रिलर चित्रपटातील फक्त 16 मिनिटांच्या भूमिकेसाठी अभिनेत्याला ऑस्कर पुरस्कार