Aishwarya Rai Video: बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय (Aishwarya Rai Bachchan) सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. अभिषेक (Abhishek Bachchan) आणि ऐश्वर्या यांचा घटस्फोट होणार असल्याच्या बातम्या वारंवार समोर येत आहे. मात्र, ऐश्वर्या आणि बच्चन कुटुंबीयांनी यावर मौन बाळगले आहे. घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान ऐश्वर्याने एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये ऐश्वर्या स्वतःची बाजू मांडताना दिसत आहे.
ऐश्वर्याने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती महिलांवरील हिंसाचार आणि अत्याचाराविषयी भाष्य करताना दिसतेय. महिलांविरुद्ध होणाऱ्या अत्याचाराविषयी आवाज उठवण्यासाठी आणि त्यांचा सामना करण्यासाठी ती भाष्य करताना दिसतेय. सध्या ऐश्वर्या आणि अभिषेक संदर्भात बऱ्याच बातम्या समोर येत असल्याचं पाहायला मिळतंय. पण यावर अद्यापही ऐश्वर्या आणि अभिषेकने कोणत्याही प्रकारचं भाष्य केलं नाही.
आत्मसन्मानाशी तडजोड करणार नाही - ऐश्वर्या राय
हा व्हिडीओ शेअर करत ऐश्वर्याने म्हटलं की, 'रस्त्यावर होणाऱ्या छळाचा सामना कसा करावा? त्या नजरांना टाळावं? नाही.. सरळ त्या नाजरांच्या डोळ्यात डोळे घालून पाहा... आपली मान कायमच उंच ठेवा. स्त्रीवादी... माझं शरीर...माझी किंमत...तुमच्या आत्मसन्मानाशी कधीही तडजोड करु नका...स्वतःवर संशय घेऊ नका. स्वतःसाठी उभे रहा. तुमच्या ड्रेस किंवा लिपस्टिकला दोष देऊ नका.रस्त्यावरील छळ हा तुमचा दोष कधीच नसतो.
ऐश्वर्या आणि अभिषेकमध्ये काहीच ठीक नसल्याच्या अफवा सुरु असतानाच ऐश्वर्याचा हा व्हिडीओ समोर आला आहे. ऐश्वर्याने नुकतेच मुलगी आराध्याच्या बर्थडे बॅशचे फोटो शेअर केले होते. ज्यामध्ये अभिषेक त्यांच्यासोबत नव्हता. कोणत्याही फोटोमध्ये बच्चन कुटुंबातील कोणीही पार्टीला हजेरी लावली नाही. त्यानंतर घटस्फोटाच्या बातम्या समोर येतायत.
अभिषेकने ऐश्वर्याचे मानले आभार
'द हिंदू'सोबत संवाद साधताना अभिषेकने म्हटलं की, मी खरंच खूप भाग्यवान आहे की, मला बाहेर जाऊन सिनेमा करण्याचा संधी मिळतेय. कारण मला माहितेय की आराध्यासोबत घरी ऐश्वर्या आहेत. त्यासाठी मी तिचे खरंच आभार मानतो. मुलं तुम्हाला कधीच कोणती तिसरी व्यक्ती म्हणून पाहत नाही. ते कायमच तुम्हाला त्यांच्या आयुष्यातली पहिली व्यक्ती म्हणून पाहत असतात.
पुढे त्याने म्हटलं की, जेव्हा माझा जन्म झाला, त्यावेळी माझ्या आईने अभिनय करायचा नाही, असा निर्णय घेतला. कारण तिला तिच्या मुलांसोबत वेळ घालवायचा होता. आम्हाला कधीच वडील आपल्या आजूबाजूला आहेत, ही जाणीव झाली नाही, कारण ते कायमच कामासाठी बाहेर असायचे आणि त्यांची उणीव आम्हाला भासायची.
ही बातमी वाचा :
Nagraj Manjule : नागराज मंजुळेंच्या कार्याची दखल , ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार गौरव