Urvashi Rautela : बॉलिवूड अभिनेत्री  उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) तिच्या स्टाईलनं प्रेक्षकांची मनं जिंकते. उर्वशी ही सध्या तिच्या चित्रपटांमुळे नाही तर वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. उर्वशीनं एकदा  मुलाखतीमध्ये सांगितले होते की, ती क्रिकेट मॅच अजिबात बघत नाही. ती सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीशिवाय कोणत्याही क्रिकेटपटूला ओळखत नाही. पण आता उर्वशीने क्रिकेट मॅच बघायला सुरुवात केली आहे. या कारणामुळे उर्वशीला सध्या ट्रोल केलं जात आहे. 


उर्वशी रौतेला ही ऋषभ पंतची एक्स गर्लफ्रेंड असल्याचे नेहमीच बोलले जाते. हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याचेही अनेकदा बोलले गेले होते.  28 ऑगस्ट रोजी उर्वशी ही भारत-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी दुबईला पोहोचली होती. तेव्हा उर्वशीला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आले होते. आता  पुन्हा उर्वशी काल झालेला भारत-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी दुबईच्या 'दुबई इंटरनॅशनल स्टेडियम' मध्ये गेली होती. उर्वशीने  इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. 


उर्वशीची पोस्ट
उर्वशीनं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती  भारत-पाकिस्तान सामना बघताना दिसत आहे. या व्हिडीओला अनेकांनी कमेंट केल्या आहेत. एका नेटकऱ्यानं उर्वशीच्या पोस्टला कमेंट केली, 'ऋषभ पंतला बघायला गेली असेल' तर दुसऱ्यानं कमेंट केली, 'तू तर क्रिकेट मॅच बघत नाही ना? '






उर्वशीने 2013 मध्ये आलेल्या 'सिंग साब द ग्रेट' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ती ''सनम रे', 'ग्रेट गँड मस्ती', 'हेट स्टेरी 4' आणि 'पागलपंती' अशा अनेक चित्रपटांमध्ये झळकली.


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 


Urvashi Rautela : भारत-पाकिस्तान सामन्यात अभिनेत्री उर्वशी रौतेलाची हजेरी! सोशल मीडियावर ट्रोल होतेय अभिनेत्री