दिल चाहता है, प्रकाश बाबा आमटे, कच्चा लिंबू यासारख्या सिनेमातून अभिनयाचं खणखणीत नाणं वाजवणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. सुबोध भावे, शरद केळकर, संहिता जोशीही तिच्यासोबत झळकणार आहेत.
प्रियंका चोप्रा, अजय देवगन, अमिताभ बच्चन, जॉन अब्राहम, माधुरी दीक्षित अशा बॉलिवूड कलाकारांपाठोपाठ उर्मिलानेही मराठी सिनेविश्वात चित्रपट निर्मिती करण्याचा विडा उचलला आहे. पती मोहसीन अख्तर मीरच्या साथीने ती सिनेमाचं प्रॉडक्शन करत आहे. 'मुंबापुरी प्रॉडक्शन्स' असं तिच्या बॅनरचं नाव आहे.
स्वप्ना वाघमारे जोशी यांनी 'माधुरी' चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा खांद्यावर घेतली आहे. त्यांनी दिग्दर्शित केलेले मितवा, फुगे, सविता दामोदर परांजपे, लाल इश्क यासारखे चित्रपट गाजले आहेत. 'माधुरीची पहिली झलक चुकवू नका आणि आपली माधुरी ओळखायला विसरू नका' अशा कॅप्शनसह स्वप्ना वाघमारे जोशींनी इन्स्टाग्रामवर टीझर पोस्ट केला आहे.
चित्रपट ट्रेड अॅनलिस्ट तरण आदर्श यांनीही ट्विटरवरुन 'माधुरी' सिनेमाचा टीझर शेअर केला आहे. हा चित्रपट येत्या 30 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.