Urmilla Kothare : देशातील नागरिक मोठ्या प्रमाणात डिजीटल व्यवहार करताना दिसत आहेत. डिलीटल व्यवहारामुळे अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत. तर दुसरीकडे या व्यवहारामुळे सायबर गुन्हेगारीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. आता मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री उर्मिला कोठारे (Urmila Kothare) सायबर क्राइमची शिकार होता होता वाचली आहे.
उर्मिला कोठारे सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. अनेक मालिका, सिनेमांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणारी उर्मिला आता एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. सायबर क्राइमची शिकार होता होता ती वाचली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने चाहत्यांना यासंदर्भात माहिती दिली आहे.
फ्रॉड मेसेजचा स्क्रीनशॉट केला शेअर
उर्मिलाने चाहत्यांसोबत तिला आलेल्या फ्रॉड मेसेजचा एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे. त्या मेसेजमध्ये लिहिलं आहे,"तुम्ही एचडीएफसी बॅंकेतील खात्याची केवायसी अपडेट केलेली नाही. त्यामुळे तुमचं खातं ब्लॉक करण्यात आले आहे. केवायसी अपडेट करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा."
स्क्रीनशॉट शेअर करत उर्मिलाने लिहिलं आहे,"मला नुकताच असा एक मेसेज आला आहे. बऱ्याचदा असे मेसेज वाचल्यानंतर लोक पॅनिक होतात आणि अशा लिंकवर क्लिक करतात. त्यामुळे तुम्हीच तुमच्या खासजी गोष्टींची माहिती फ्रॉड लोकांना देता".
उर्मिलाने पुढे लिहिलं आहे,"त्यामुळे तुमचं बॅंक अकाऊंट हॅक होऊ शकतं. मला आलेल्या मेसेजमधली लिंक मी पाहिली पण त्याच एचडीएफसी बॅंकेचे पूर्ण नाव लिहिण्यात आले नव्हते. त्यामुळे मला शंका आली. मित्रांनो माफ करा. नशिबाने साथ दिली".
उर्मिलाने फ्रॉड मेसेजचा स्क्रीनशॉट शेअर करत चाहत्यांना सतर्क केलं आहे. तसेच मोबाईलवर येणाऱ्या लिंक आधी तपासा त्यानंतरच क्लिक करा असं आवाहनदेखील केलं आहे. उर्मिला कानेटकर सिनेविश्वातली एक यशस्वी अभिनेत्री आहे. 'शुभ मंगल सावधान' या सिनेमाद्वारे तिने सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे. तर 'असंभव' या मालिकेच्या माध्यमातून उर्मिला घराघरांत पोहोचली.
'शुभ मंगल सावधान' या मालिकेच्या सेटवर उर्मिला आणि आदिनाथ कोठारेची भेट झाली. अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
संबंधित बातम्या