Miss Universe 2022: अमेरिकेची आर बोनी गॅब्रिएल (R’Bonney Gabriel) ही 'मिस युनिव्हर्स-2022' (Miss Universe 2022) या स्पर्धेची विजेती ठरली आहे. 15 जानेवारी रोजी न्यू ऑर्लिन्स येथे झालेल्या समारंभात 71 व्या मिस युनिव्हर्स स्पर्धाच्या विजेतीची घोषणा करण्यात आली. अमेरिकेच्या (USA) आर बोनी गॅब्रिएलनं मिस युनिव्हर्स 2022 चा मुकुट जिंकला. 'मिस युनिव्हर्स-2022' या स्पर्धेत 80 हून अधिक ब्युटी क्वीन्स सहभागी झाल्या होत्या. भारताची दिविता राय टॉप 16 मध्ये पोहोचली पण टॉप-5 मध्ये तिला स्थान मिळाले नाही.
भारताच्या हरनाज संधूनं यावेळी आर बोनी गॅब्रिएलला मिस युनिव्हर्सचा मुकुट घातला. या स्पर्धेची मिस डोमिनिकन रिपब्लिक एंड्रीना मार्टिनेझ ही दुसरी रनर-अप ठरली, तर पहिली रनर-अप मिस व्हेनेझुएला अमांडा दुडामेल ही ठरली. व्हेनेझुएला, अमेरिका, प्यूर्टो रिको, क्रयुरासाओ आणि डोमेनिकन रिपब्लिक या देशांच्या स्पर्धकांनी टॉप-5 स्पर्धांच्या यादीत स्थान मिळवले.
कोण आहे आर बोनी गॅब्रिएल?
आर बोनी गॅब्रिएल ही 28 वर्षाची आहे. ती ह्यूस्टन, टेक्सास (Texas) येथील फॅशन डिझायनर आहे. आर बोनी गॅब्रिएलचा जन्म 20 मार्च 1994 रोजी सॅन अँटोनियो, टेक्सास येथे झाला. तिची आई अमेरिकन आणि वडील फिलिपिनो आहेत.
'मिस युनिव्हर्स-2022' स्पर्धेचा मुकुट आहे खास
मिस युनिव्हर्स-2022 च्या विजेतीला जो क्राऊन घालण्यात आला आहे, तो अतिशय खास आहे. "फोर्स फॉर गुड" (Force for Good) असं नाव या मुकुटाला देण्यात आलं आहे. मुकुटमध्ये 993 स्टोन सेटिंग्ज, 110.83 कॅरेट नीलम आणि 48.24 कॅरेट व्हाईट डायमंड्स आहेत. या मुकुटाची किंमत जवळपास सहा मिलियन डॉलर म्हणजेच 49 कोटी एवढी आहे. जिनिव्हा, स्वित्झर्लंड येथे स्थित Mouawad या दागिन्यांच्या कंपनीने हा क्राऊन डिझाइन केला आहे. हा क्राऊन पटावलेल्या आर बोनी गॅब्रिएलला सध्या जगभरातील लोक शुभेच्छा देत आहेत.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
Miss Universe 2023 : कोण आहे दिविता राय? मिस युनिव्हर्स 2023 स्पर्धेत करतेय भारताचे प्रतिनिधित्व