Upendra Limaye New Bollywood Movie : अभिनेता उपेंद्र लिमये (Upendra Limaye) हा नुकताच अॅनिमल (Animal) या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटात उपेंद्रने छोटी पण महत्त्वाची भूमिका साकारली होती जी प्रेक्षकांच्याही बरीच पसंतीस उतरली. आता पुन्हा एकदा उपेंद्र एका बॉलीवूड चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याचा 'मडगाव एक्सप्रेस' (Madgoan Express) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. उद्या म्हणजेच 5 मार्च रोजी या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यात येईल.
उपेंद्रचा या सिनेमातील लूक नुकताच समोर आला होता. तसेच त्याने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुनही या संदर्भात माहिती दिली होती. त्यामुळे पुन्हा एकदा उपेंद्र त्याची बॉलीवूड एक्स्प्रेस सुसाट करण्यासाठी सज्ज झालाय. सध्या प्रेक्षकांना या सिनेमाच्या ट्रेलरची प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे.
मडगाव एक्सप्रेसमधील उपेंद्रचा रॉकिंग अंदाज
उपेंद्रचा या चित्रपटातील रॉकिंग अंदाज समोर आला आहे. यामध्ये उपेंद्रच्या लूकमुळे तसेच त्याच्या डॉयलॉग्जमुळे सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या चित्रपटात उपेंद्र मेंडोझा हे अतरंगी पात्र साकारणार आहे. त्यामुळे उपेंद्रची ही भूमिका प्रेक्षकांच्या कितपत पसंतीस पडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच उपेंद्रची ही भूमिका नेमकी काय असणार याची देखील उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे.
कुणाल खेमूचं दिग्दर्शनात पदार्पण
मडगाव एक्सप्रेस या चित्रपटाच्या माध्यातून दिग्दर्शक कुणाल खेमू त्याचं पदार्पण करणार आहे. काही दिवसांपूर्वी या सिनेमाची घोषणा करण्यात आली होती. आता या सिनेमातील उपेंद्रचा लूक समोर आलाय. या सिनेमात द्विवेंदू, प्रतीक गांधी, अविनाश तिवारी हे मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. तसेच या सिनेमात नोरा फतेही देखील मुख्य भूमिका साकारणार असल्याचं समोर आलंय. हा चित्रपट 22 मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.