Urfi Javed: मॉडेल आणि अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) ही सध्या चर्चेत आहे. उर्फी तिच्या अतरंगी फॅशन स्टाईलनं अनेकांचे लक्ष वेधते. नुकताच उर्फीनं तिच्या नो मेकअप लूकमधील सेल्फी सोशल मीडियावर ( Social Media) शेअर केला. या फोटोला उर्फीनं दिलेल्या कॅप्शननं अनेकांचे लक्ष वेधले.
उर्फीनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमध्ये तिचा चेहरा सुजलेला दिसत आहे. उर्फीनं तिच्या नो-मेकअप लूकचा फोटो शेअर करुन त्याला कॅप्शन दिलं, 'क्या से क्या हो गया, एलर्जीचा परिणाम. आता मी कोणासारखी दिसत आहे?' उर्फीच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले.
उर्फीच्या या पोस्टला कमेंट करुन अनेक नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे. एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'तू मेकअप न केलेल्या राखी सावंतसारखी दिसत आहेस'
तर उर्फीच्या पोस्टला एका युझरनं कमेंट केली, 'पूर्ण कपडे घातल्यामुळे एलर्जी झाली असेल.'
अनेकांनी उर्फीच्या पोस्टला कमेंट करुन तिच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली. काही दिवसांपूर्वी उर्फीनं तिचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोमध्ये उर्फीचा चेहरा हा सुजलेला दिसत होता तर तिच्या डोळ्याखाली काळा डाग दिसत होते. त्या फोटोला उर्फीनं कॅप्शन दिलं होतं, 'काल मी हे मेकअपनं लपवलं. मला स्वत:वर अभिमान आहे. मला कोणी मारलं नाहीये. मी आय फिलर्स केलं आहे. त्यामुळे मला थोडी जळजळ जाणवत आहे.'
गेल्या काही दिवसांपासून उर्फीची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फीच्या फॅशनवर टीका केली होती. उर्फी जावेदवर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी चित्रा वाघ यांनी पोलिसांकडे केली होती. त्यानंतर उर्फीनं सोशल मीडियाच्या माध्यामातून चित्रा वाघ यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं होतं.
अॅक्टिंग, मॉडेलिंगक्षेत्रातमध्ये उर्फीनं काम केलं. दुर्गा, सात फेरों की हेराफेरी, बेपनाह, जीजी मां, डायन, ये रिश्ता क्या कहलाता है, पंच बीट सीजन 2 आणि कसौटी जिंदगी की या प्रसिद्ध मालिकांमध्ये उर्फीनं काम केलं आहे. उर्फी सोशल मीडियावर सक्रिय असते. ती वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करते. अनेक वेळा उर्फीच्या लूकला नेटकरी ट्रोल करतात.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
Celebrity Photoshoot : वनिता खरात ते रणवीर सिंह; उर्फी जावेदआधी 'या' कलाकारांनी केलंय न्यूड फोटोशूट