Sudheer Varma Suicide: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सुधीर वर्मानं (Sudheer Varma) आत्महत्या केली आहे. सुधीरनं अनेक तेलुगू चित्रपटांमध्ये काम केलं. सुधीरनं 23 जानेवारी रोजी विशाखापट्टणम येथील राहत्या घरी आत्महत्या केली. सुधीर वर्माच्या मृत्यूचे खरे कारण अद्याप समोर आलेले नाही. पण गेल्या काही दिवसांपासून सुधीर हा मानसिक तणावाचा सामना करत होता, असं म्हटलं जात आहे. सुधीरच्या निधनाने संपूर्ण साउथ फिल्म इंडस्ट्रीला धक्का बसला आहे.
सुधीर वर्मासोबत काम केलेला अभिनेता सुधाकरनं सोशल मीडियाद्वारे सुधीरला श्रद्धांजली वाहिली. त्यानं ट्वीटमध्ये लिहिलं, 'सुधीर! भावा, तू खूप चांगला मुलगा होतास. तू या जगात नाहीयेस, हे खरं वाटतं नाहीये. ओम शांती'
अभिनेत्री चांदिनी चौधरीनं देखील सुधीर वर्मासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करुन तिनं लिहिलं, 'सुधीर तुझ्या जाण्यानं मन दुखावले आहे. तू एक चांगला सहकलाकार आणि मित्र होतास. आम्हाला तुझी आठवण येईल. माझ्या मित्रा, तुझ्या आत्म्याला शांती लाभो.'
2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'स्वामी रा रा' या चित्रपटामधून सुधीरनं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. तसेच त्यानं 2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या Kundanapu Bomma या चित्रपटात देखील काम केले. सेकंड हँड या तेलुगू चित्रपटामध्ये सुधीरनं काम केलं. या चित्रपटांमुळे सुधीरला विशेष लोकप्रियता मिळाली. सुधीर हा तेलुगू चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेता होता. शूट आउट अॅट अलॅर या वेब सीरिजमध्ये देखील त्यानं काम केलं.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: