सातारा : अक्षय कुमार सध्या सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात केसरी या त्याच्या आगामी सिनेमाच्या शुटिंगसाठी मुक्कामाला आहे. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी ‘केसरी’च्या सेटवर जाऊन अक्षय कुमारची गळाभेट घेतली.
अक्षय कुमारचा केसरी सिनेमा 22 मार्च 2019 ला रिलीज होणार आहे.
आपल्या जिल्ह्यात आलेल्या पाहुण्या अक्षय कुमारला भेटण्यासाठी उदयनराजे स्वतः सिनेमाच्या सेटवर गेले आणि बॉलिवूडच्या खिलाडीला भेटले.
दोनच दिवसांपूर्वी पिंपवडे बुद्रुक या गावात पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून जलसंधारणाच्या कामाला सुरुवात झाली आहे. शुटींगच्या निमित्ताने या भागातून प्रवास करणाऱ्या अक्षय कुमारला हे दिसलं आणि गावकऱ्यांसोबत श्रमदानात सहभागी व्हायचं त्याने ठरवलं.
त्यासाठी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्याशी त्याने संपर्क साधला आणि दोघेही पिंपवड्याच्या ग्रामस्थांसह श्रमदानात सहभागी झाले. अक्षय कुमारने यावेळी गावाच्या या कामासाठी 25 लाख रुपयांची मदत जाहीर केली.
या बातमीचे आणखी फोटो पाहा
साताऱ्यात उदयनराजे आणि अक्षय कुमारची गळाभेट
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
12 Apr 2018 05:51 PM (IST)
साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी ‘केसरी’च्या सेटवर जाऊन अक्षय कुमारची गळाभेट घेतली. अक्षय कुमारचा केसरी सिनेमा 22 मार्च 2019 ला रिलीज होणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -