मुंबई : सहा दिवसांनंतर ट्विटरवर परतलेल्या गायक अभिजीत भट्टाचार्यचं ट्विटर हॅण्डल पुन्हा एकदा सस्पेंड करण्यात आलं आहे. अभिजीतने सोमवारीच नवं अकाऊंट सुरु केलं होतं.


काही दिवसांपूर्वी महिलांवर आक्षेपार्ह ट्वीट केल्याने, अभिजीतचं ट्विटर हॅण्डल सस्पेंड केलं होतं. पण सहा दिवसांनी त्याने पुन्हा ट्विटरवर एन्ट्री केली होती.

अभिजीतने नव्या अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला होता.

"माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे.


देशाच्या सैन्याविरोधात घोषणा देणाऱ्यांना माझा विरोध आहे.


आपण सगळे एकत्र आहोत.


माझं व्हेरिफाईड अकाऊंट पुन्हा अॅक्टिव्ह होत नाही,


तोपर्यंत तुम्ही मला या अकाऊंटवर फॉलो करा, आय एम बॅक.


देशाविरोधात आवाज उठवणाऱ्यांची सगळे मिळून सफाई करुया.


भारत माता की जय, अगेन वंदे मातरम" असं अभिजीतने या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.


22 मे रोजी जेएनयूची विद्यार्थिनी शेहला रशिदसह काही महिला ट्विटराईट्सवर त्याने हीन शब्दात टीका केली होती. त्यानंतर अभिजीत विरोधात सोशल मीडिया यूझर्सनी तक्रार केली. अभिजीतने हे ट्वीट डिलीट केलं, त्यानंतर ट्विटरने कारवाई करत त्याचं अकाऊण्ट सस्पेंड केलं होतं.


दरम्यान, अभिजीतचं ट्विटर अकाऊण्ट सस्पेंड केल्यानंतर बॉलिवूड गायक सोनू निगमने ट्विटर सोडण्याचा निर्णय घेतला.

संबंधित बातम्या


महिलांविषयी आक्षेपार्ह ट्वीट, गायक अभिजीतचं ट्विटर हँडल सस्पेंड


सोनू निगमनंतर राम गोपाल वर्मांचाही ट्विटरला रामराम


24 ट्वीट करुन सोनू निगमचा ट्विटरला अलविदा