मुंबई : बिझनेस वुमन आणि बॉलिवूड अभिनेत्री ट्विंकल खन्ना बिनधास्त अंदाज आणि उत्तम सेन्स ऑफ ह्युमरसाठी ओळखली जाते. थिएटरमध्ये चित्रपट सुरु होण्यापूर्वी राष्ट्रगीत अनिवार्य केल्याच्या निर्णयावर ट्विंकल खन्नाने एका ब्लॉगच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित केला आहे.



चित्रपट सुरु होण्याआधी थिएटरमध्ये राष्ट्रगीत लावा : सर्वोच्च न्यायालय


 

चित्रपट सुरु होण्यासाठी थिएटरमध्ये राष्ट्रगीतासह पडद्यावर राष्ट्रध्वज दाखवा, असा आदेशच सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी देशभरातील चित्रपटगृहांना दिला आहे. त्याचाच आधार घेत ट्विंकल खन्नाने आक्षेप नोंदवला आहे.



थिएटरमध्ये अनिवार्य, मात्र सुप्रीम कोर्टाला न्यायालयात राष्ट्रगीत नको


 

ट्विंकल खन्ना लिहिते की, "मी ऑफिसला जात होते. फोनवर स्क्रोल करताना बातमी वाचली की, चित्रपट सुरु होण्याआधी थिएटरमध्ये राष्ट्रगीत लागेल. तसंच राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ सगळ्यांना उभं राहावं लागेल.



राष्ट्रगीत आणि राष्ट्रध्वजाचा अपमान केल्यास शिक्षा काय?


 

मी 'बेफिक्रे' सिनेमाचं तिकीट घेतलं आहे आणि रणवीर सिंहला एका राईट रेड अंडरवेअरमध्ये पाहणार आहे, हे माहित आहे. तर थिएटरमध्ये का आणि कशी देशभक्ती जागी होईल?, हेच मला समजत नाही"

वृत्तपत्रात छापलेल्या ब्लॉगचा फोटो ट्विंकलने इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.