मुंबई : श्रद्धा कपूर आणि आदित्य रॉय कपूर यांचा 'ओके जानू' या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ए आर रहमानने या सिनेमाला संगीत दिलं आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये नासिरुद्दीन शाहदेखील दिसत आहेत


'ओके जानू' हा मणिरत्नम यांचा तामीळ सिनेमा 'ओके कनमणि' या सिनेमाचा रिमेक आहे.

याआधी श्रद्धा आणि आदित्यने 'आशिकी-2'मध्ये एकत्र काम केलं आहे. त्यावेळी या दोघांची जोडी प्रेक्षकांना आवडली होती. आता 'ओके जानू'च्या निमित्ताने हे दोघे पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत.

चित्रपटाचा ट्रेलर दमदार आहे. कॉलेज पूर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी श्रद्धाला पॅरिस तर आदित्यला अमेरिकेत जायचं आहे. पण त्याआधी दोघं एकत्र राहण्याचा निर्णय घेतात. पण दोघांना पॅरिस आणि अमेरिकेतून बोलावणं येतं तेव्हा दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडलेले असतात. यानंतर दोघे काय निर्णय घेतात, हे सिनेमा पाहिल्यानंतर कळेल.

सिनेमात या दोघांची हॉट केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. शाद अली दिग्दर्शित हा चित्रपट 13 जानेवारी रोजी रिलीज होणार आहे.