Twinkle Khanna: अभिनेता अक्षय कुमारची (Akshay Kumar) पत्नी ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna) ही सोशल मीडियावर खूप अॅक्टीव असते. ट्विंकल आणि अक्षय हे त्यांच्या कुटुंबासह सुट्टीसाठी मालदीवला गेली आहे. जिथे ट्विंकलनं तिच्या संपूर्ण कुटुंबासोबत वाढदिवस देखील साजरा केला. ट्विंकलने आता एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यामध्ये मालदीवमध्ये तिच्यासोबत घडलेली एक मजेशीर घटना दिसत आहे. ट्विंकलनं या व्हिडीओला खास कॅप्शन देखील दिलं आहे.


मालदीवमध्ये सायकलिंग करताना घडली मजेशीर घटना


ट्विंकलनं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये  संपूर्ण ट्रीपची खास झलक दाखवली आहे. या व्हिडीओच्या सुरुवातीला ट्विंकल सायकल चालवताना दिसते सायकलिंग करताना तिचा तोल जातो आणि ती एका खांबाला धडकते, असं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. अशताच पत्नीला खांबाला धडकताना पाहून अक्षय कुमार खळखळून हसतो. 


व्हिडीओला दिले खास कॅप्शन


ट्विंकलनं इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या मालदीव ट्रीपच्या व्हिडीओला कॅप्शन दिलं, 'माझी सायकल खांबाला धडकण्या व्यतिरिक्त, ही ट्रीप मला खरोखरच स्वर्गात गेल्यासारखी वाटली.तुमच्याकडे नवीन वर्षासाछी कोणतेही मोठे संकल्प असतील तर  ते खाली कमेंटमध्ये शेअर करुन इतरांना प्रेरणा द्या' ट्विंकलनं शेअर केलेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.


पाहा व्हिडीओ:






ट्विंकलनं शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला ट्विंकलच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनची झलकही पाहायला मिळेल. ज्यामध्ये ती केक कट करताना दिसत आहे.याशिवाय ट्विंकलनं तिथे तिच्या पुस्तकाची सक्सेस पार्टीही ठेवली होती. काही दिवसांपूर्वी ट्विंकलचे नवीन पुस्तक वेलकम टू पॅराडाइज लाँच करण्यात आले असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ट्विंकल आणि अक्षयने नवीन वर्षाचे स्वागत आपल्या मुलांसोबत केले.


ट्विंकल खन्नाने 'या' चित्रपटांमध्ये केलं काम 


ट्विंकल खन्नाने अभिनय सोडून पुस्तके लिहायला सुरुवात केली आहे. तिने आतापर्यंत अनेक पुस्तके लिहिली आहेत.  बरसात,जब प्यार किसी से होता है, बादशाह, मेला  यांसारख्या चित्रपटांमध्ये ट्विंकलनं काम केलं आहे. 


ट्विंकल खन्नाचा पती अक्षय कुमार हा लवकरच वेलकम टू द जंगल या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Twinkle Khanna: ट्विंकल खन्नाचा लंडनच्या स्विमिंग पुलावरील हॉट व्हिडीओ, चाहते म्हणाले... परफेक्ट फिगर