TV Actress Krishna Mukherjee : 'ये हैं मोहब्बतें' (Yeh Hai Mohabbatein) या  मालिकेच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री कृष्णा मुखर्जी (Krishna Mukherjee) सध्या चर्चेत आहे. 'ये हैं मोहब्बतें' या मालिकेनंतर अभिनेत्री 'शुभ शगुन' (Shubh Shagun) या मालिकेत दिसून आली. आता 'शुभ शगुन' मालिकेच्या निर्मात्यांवर अभिनेत्रीने गंभीर आरोप केले आहेत. अभिनेत्रीने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना माहिती दिली होती की, 'शुभ शगुन'चे निर्माते कुंदन सिंह यांनी सेटवर तिचा छळ केला होता. त्यामुळे तिला नैराश्याचा सामना करावा लागला. आता कृष्णाने नुकतचं एका मुलाखतीत याबद्दल भाष्य केलं आहे. मालिका मिळाल्यापासून ते मालिकेच्या शूटिंगदरम्यानच्या अनुभवांवर तिने भाष्य केलं आहे. 


कृष्णा मुखर्जीने टेलीटॉक इंडियाला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे की, तिला शूटिंगदरम्यान पैसे मिळत नसे. याबद्दल तिने आवाज उठवला असता तिला शूटिंग न करण्यास सांगितले. तसेच तिला छळ करण्यात आला. 'शुभ शगुन' या मालिकेची निर्माती आधी राहुल ठाकरे यांच्या निर्मितीसंस्थेअंतर्गत होणार होती. पण कृष्णा ज्यावेळी कॉन्ट्रैक्ट साइन करायला गेली तेव्हा तिच्यासमोर कुंदन सिंह आले. तसेच कुंदन सिंह या मालिकेचे नवे निर्माते असल्याचं तिला सांगण्यात आलं. 


कृष्णा मुखर्जीचा निर्मात्यांकडून छळ


कृष्णा मुखर्जी म्हणाली,"शुभ शगुन' या मालिकेच्या शूटिंगला मार्च 2022 मध्ये सुरुवात झाली. सुरुवातीचा एक महिना सर्वकाही ठिक होतं. पण पुढे निर्मात्याचा व्यवहार बदलला. कुंदन सिंह स्वत:ला गुंड समजतो. मी गुंड आहे, असं तो सेटवर म्हणत असे. शूटिंगच्या काही दिवसांनी आम्ही त्याला चेक कधी मिळणार विचारला असला त्याने टाळाटाळ करायला सुरुवात केली. शूटिंग सुरू होऊन चार महिने झाल्यानंतरही मला चेक मिळाला नाही. तेव्हा मी त्याला काम करण्यास नकार दिला. त्यामुळे त्याने सर्व कलाकारांना चेक दिले. पण नंतर पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण झाली. तो चेक न देता टाळाटाळ करू लागला. एक दिवस माझी प्रकृती स्थिर नव्हती. त्या परिस्थितीतही त्याने मला शूट करायला लावलं". 


कृष्णा पुढे म्हणाली,"एक दिवस मी शूटिंग करणार नाही, असं कळवलं. त्यावेळी कुंदन तू कुठे जाते तेच पाहतो, कोणालाही कॉल कर, असं म्हणाला. पुढे निर्मात्यासमोर मी दरवाजा बंद केला आणि कपडे बदलू लागले. मी कपडे बदलत असताना वारंवार निर्माते दरवाजा आपटत होते". 


सहकलाकार आले मदतीला


कृष्णाच्या मदतीला तिची एक सहकलाकार आली. बाथरुममध्ये जाऊन कपडे बदल असा सल्ला तिने कृष्णाला दिला. पुढे कृष्णा कपडे बदलून बाहेर आली तेव्हा तो दरवाजा बाहेरुन बंद होता. निर्माते तिला म्हणाले,"पुन्हा कपडे बदल आणि शूटिंगला चल. पुढे तिचा एक सहकलाकार आला आणि त्याने दरवाजा उघडला. त्या सेटवर मी अजिबात सुरक्षित नव्हते". 


संबंधित बातम्या


Bollywood Actors : कोणाचे 25, तर कोणाचे 50 रुपये; अमिताभ बच्चन, शाहरुख खान ते पंकज त्रिपाठी; तुमच्या लाडक्या बॉलिवूडकरांची पहिली कमाई किती होती?