Tunisha Sharma Death : अभिनेत्री तुनिषा शर्माच्या (Tunisha Sharma) आत्महत्येने मनोरंजनसृष्टी हादरली आहे. तिने आयुष्य का संपावलं यावर अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. प्रसिद्धीची एक उंची गाठल्यानंतर आत्महत्येचं पाऊल उचलणारी तुनिषा ही पहिली अभिनेत्री नाही. तिच्या आधीदेखील अनेक सेलिब्रिटींनी आपलं आयुष्य अशाचप्रकारे संपवलं आहे.
वैशाली ठक्कर (Vaishali Thakkar) :
'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेत्री वैशाली ठक्करने एक्स बॉयफ्रेंड राहुल नवलानी आणि त्याची बायको दिशामुळे गळफास घेत 16 ऑक्टोबर 2022 रोजी आत्महत्या केली. तिने सुसाईड नोटमध्ये एक्स बॉयफ्रेंड राहुल खूप त्रास देत असल्याचे लिहिले होते.
प्रत्युषा बॅनर्जी (Pratyusha Banerjee) :
'बालिका वधू' या लोकप्रिय मालिकेत आनंदीची भूमिका साकारणारी प्रत्युषा बॅनर्जीने वयाच्या 24 व्या वर्षी 1 एप्रिल 2016 रोजी आत्महत्या केली. ती निर्माता राहुल राज सिंहसोबत रिलेशनमध्ये होती. प्रत्युषाने राहुलमुळेच आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या पालकांनी केला आहे.
प्रेक्षा मेहता (Preksha Mehta) :
'क्राईम पेट्रोल' या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या प्रेक्षा मेहताने काम मिळत नसल्याने 26 मे 2020 रोजी आत्महत्या केली. कोरोनाकाळात काम न मिळाल्याने ती ड्रिपेशनमध्ये गेली होती. 'सर्वात वाईट असतं ते म्हणजे तुमची स्वप्न मरुन जाणं' ही प्रेक्षाची शेवटची पोस्ट होती.
जिया खान (Jiah Khan) :
'गजनी','हाऊसफुल्ल' अशा लोकप्रिय सिनेमांत झळकलेली अभिनेत्री जिया खानने 3 जून 2013 रोजी आत्महत्या केली. जियाला बॉयफ्रेंड, अभिनेता सूरज पांचोलीने आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप लावण्यात आला. तसेच जिया खान प्रेग्नंट असल्याचा दावादेखील करण्यात आला.
सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) :
अभिनेता सुशांत सिंह राजपूतने 14 जून 2020 रोजी आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येने चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. सुशांतने नैराश्यात असल्याने आत्महत्या केल्याचा संशय आहे. अद्याप त्याच्या आत्महत्येबाबत तपास सुरू आहे.
कुशल पंजाबी (Kushaal Punjabi) :
कुशल पंजाबीने वयाच्या 37 व्या वर्षी 26 डिसेंबर 2019 रोजी आत्महत्या केली. चांगली ऑफर मिळत नसल्याने तसेच सिनेमे बॉक्स ऑफिसवर हिट होत नसल्याने त्याने आत्महत्या केली आहे.
मनमीत ग्रेवाल (Manmeet Grewal) :
अभिनेता मनमीत ग्रेवालने 15 मे 2020 रोजी आर्थिक संकट आणि नैराश्यातून आत्महत्या केली.
संदीप नहार (Sandeep Nahar) :
'धोनी द अनटोल्ड स्टोरी'मध्ये झळकलेल्या तसेच 'केसरी' सिनेमात महत्त्वाची असलेल्या संदीप नहारने 16 फेब्रुवारी 2021 रोजी आत्महत्या केली. इंडस्ट्रीतील स्ट्रगल आणि मानसिक तणावातून त्याने आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे.
इंदर कुमार (Inder Kumar) :
इंदर कुमारने 28 जुलै 2017 रोजी बॉलिवूडमध्ये यश न मिळाल्याने आत्महत्या केली. मृत्यूआधी त्याने व्हिडीओ शूट करत आपली व्यथा मांडली.
संबंधित बातम्या