Comedy Films Free On OTT : सिनेमागृहांपेक्षा ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवर घसबसल्या सिनेमे (Movies) पाहायला प्रेक्षक पसंती दर्शवत आहेत. ओटीटी प्लॅटफॉर्मवर सिनेमा पाहण्यासाठी सब्सक्रिप्शन घ्यावं लागतं. पण काही ओटीटी प्लॅटफॉर्मवर मात्र सब्सक्रिप्शन न घेता मोफत सिनेमे पाहता येत आहेत. त्यामुळे नाताळची सुट्टी सिनेप्रेक्षकांना मनोरंजनात्मक घालवता येणार आहे. जाणून घ्या कोणते सिनेमे प्रेक्षक मोफत पाहू शकतात...
वेलकम बॅक (Welcome Back) :
'वेलकम बॅक' या सिनेमात जॉन अब्राहम, अनिल कपूर (Anil kapoor) आणि नाना पाटेकर (Nana Patekar) मुख्य भूमिकेत आहेत. हा विनोदी सिनेमा असून हा सिनेमा प्रेक्षक जिओ सिनेमावर मोफत पाहू शकतात. या सिनेमात दाक्षिणात्य सुपरस्टार श्रृती हासन (Shruti Haasan) प्रमुख भूमिकेत आहे.
फिर हेरा फेरी (Phir Hera Pheri) :
विनोदी सिनेमांच्या यादीत 'फिर हेरा फेरी' या सिनेमाचा उल्लेख नसेल असं होऊच शकत नाही. सर्वोत्कृष्ट विनोदी सिनेमांच्या यादीत 'फिर हेरा फेरी' या सिनेमाचा समावेश आहे. हा सिनेमादेखील प्रेक्षक जिओ सिनेमावर पाहू शकतात.
पार्टनर (Partner) :
बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) आणि गोविंदाचा (Govinda) 2007 साली आलेला 'पार्टनर' हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. मनोरंजनाचा डबल धमाका असलेल्या या सिनेमाने प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले. हा सिनेमादेखील प्रेक्षक जिओ सिनेमावर मोफत पाहू शकतात.
खट्टी मीठा (Khatta Meetha) :
खिलाडी कुमारच्या (Akshay Kumar) 'खट्टा मीठ्ठा' या सिनेमाने चांगलाच धुमाकूळ घातला होता. या सिनेमात विनोदवीर राजपाल यादव (Rajpal Yadav) आणि जॉनी लीवर (Johnny Lever) असल्याने त्यांनी प्रेक्षकांना खळखळून हसवले. हा सिनेमा जिओ सिनेमावर मोफत उपलब्ध आहे.
बिन बुलाए बाराती (Bin Bulaye Baraati) :
अभिनेता आफताब शिवदासानी, विजय राज आणि संजय मिश्रा यांचा 'बिगन बुलाए बाराती' हा सिनेमा प्रेक्षकांना जिओ सिनेमावर पाहता येईल.
रूही (Roohi) :
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) आणि अभिनेता राजकुमारच्या (Rajkummar Rao) 'रूही' या विनोदी भयपटाने सिनेरसिकांचं चांगलचं मनोरंजन केलं आहे. हा सिनेमा जिओ सिनेमावर प्रेक्षक आता घरबसल्या मोफत पाहू शकतात.
गोलमाल 3 (Golmaal 3) :
रोहित शेट्टीचा (Rohit Shetty) बहुचर्चित 'गोलमाल 3' हा सिनेमादेखील जिओ सिनेमावर मोफत उपलब्ध आहे.
संबंधित बातम्या