Tunisha Sharma Suiccide Case : अभिनेत्री तुनिषा शर्मा (Tunisha Sharma) आत्महत्येप्रकरणी शिझान खानच्या (Sheezan Khan) जामीनासाठी वसई न्यायालयाकडे अर्ज करण्यात आला आहे. 31 डिसेंबर रोजी शिझानला न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यानंतर आता त्याच्या जामीनासाठी वसई न्यायालयात जामीन अर्ज दाखल करण्यात आला आहे. 


तुनिषा शर्माने आत्महत्या केल्यानंतर शिझान खानवर अनेक आरोप झाले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. अटक केली. त्यानंतर त्याला वसई न्यायालयात हजर करण्यात आलं. वसई न्यायालयाने 31 डिसेंबर रोजी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती आणि त्यानंतर आता शिझानच्या जामीनासाठी वसई न्यायालयामध्ये अर्ज करण्यात आला आहे. 


शिझान खानला 14 दिवसांची न्यायलयीन कोठडी मिळाली आहे. आज त्याच्या जामीनासाठी वकीलांनी अर्ज केला आहे. आज तुनिषाचे कुटुंबीय पत्रकार परिषद घेणार आहेत. तुनिषाचे कुटुंबीय काय गौप्यस्फोट करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता न्यायालय काय सुनावणी देणार हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे. 




नेमकं प्रकरण काय? 


हिंदी टेलिव्हिजन मालिकांमधली अभिनेत्री तुनिषा शर्मानं आत्महत्या केली आहे. वसईनजिकच्या नायगावमध्ये एका मालिकेचं शूटिंग सुरु असताना ही धक्कादायक घटना घडली. तुनिषाच्या आत्महत्येला तिचा मित्र शिझान खान जबाबदार असल्याची तक्रार तिच्या आईनं वालीव पोलीस स्थानकात केली आहे. त्यानंतर वसई पोलिसांनी शिझानला ताब्यात घेतलं आहे. 


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तुनिषा शर्मानं शिझान खानच्या मेकअप रूममध्ये गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं. तुनिशा आणि शिजान हे दोघं सध्या सब टीव्हीच्या अलिबाबा... दास्तान-ए-काबुल या मालिकेत मुख्य भूमिकेत एकत्र काम करत होते. याच मालिकेच्या सेटवर मेकअप करतानाचा एक व्हिडीओ तुनिशानं आत्महत्येच्या काही वेळ आधी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला होता. त्यामुळं सेटवरच्या कलाकार आणि तंत्रज्ञांसह तुनिषाच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसला. तुनिषानं गळफास घेतल्याचं लक्षात येताच, तिला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.


संबंधित बातम्या


Tunisha Sharma Suicide Case: "मी निर्दोष... न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास"; तुनिषा शर्मा प्रकरणातील मुख्य आरोपी शीझान खानची प्रतिक्रिया