Tum Kya Mile Song: अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) यांच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' (Rocky Aur Rani Kii Prem Kahani) या चित्रपटातील 'तुम क्या मिले' (Tum Kya Mile) हे गाणे लवकरच रिलीज होणार आहे. हे गाणं रिलीज होण्यापूर्वी 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाचा दिग्दर्शक करण जोहरने (Karan Johar) एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यानं लिहिलं आहे की, हे गाणं तो यश चोप्रांना डेडिकेट करत आहे.
करणची पोस्ट
करण जोहरनं तुम क्या मिले या गाण्यातील आलिया आणि रणवीरचा फोटो शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, काही तासात तुम क्या मिले हे गाणं तुमच्या भेटीस येईल. मला आठवते की, माझी अगदी सुरुवातीपासूनच इच्छा होती की, मला एक प्रेम गीत असणारा चित्रपट करायचा होता, जो माझे गुरू यश चोप्रा यांना मी डेडिकेट करेल. मग मी स्वत:ला सांगू लागलो की, तू तसे करण्याची हिंमत करणार नाहीस. पण फॅन बॉय, स्नो, शिफॉन, काश्मीर या सगळ्याची आवड असल्यामुळे मला पुढे जाण्याची प्रेरणा मिळाली.
पुढे करणनं पोस्टमध्ये लिहिलं, 'प्रीतम दादा आणि मला खूप दिवसांपासून असं गाणं बनवायचं होतं. वैभवी मर्चंटने या गाण्याची संपूर्ण जबाबदारी स्वत:वर घेतली आणि यश चोप्रा यांचे चाहत्यांनी हे गाणे अतिशय सुंदरपणे पूर्ण केले. मुलीच्या जन्मानंतर (राहा) आलियाचे हे पहिले शूट आहे आणि मनीष मल्होत्राच्या शिफॉन साडीमध्ये तिला थंडीत शूट करायला लावल्याबद्दल मी तिची माफी मागतो. रणवीर घाबरला होता कारण हे त्याचे पहिले लिप सिंक माउंटन लव्ह गाणे होते. मला आशा आहे की आम्हाला जेवढी थंडी जाणवली आहे तेवढेच प्रेम तुम्हालाही जाणवेल. यश काका हे तुमच्यासाठी आहे.. तुमचा चाहता करण!'
'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटामध्ये रणवीर आणि आलियासह धर्मेंद्र, शबाना आझमी आणि जया बच्चन हे कालकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. हा चित्रपट 28 जुलै 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे.
संबंधित बातम्या