Julian Sands : ब्रिटिश अभिनेते ज्युलियन सँड्स (Julian Sands) सध्या चर्चेत आहेत. ज्युलियन सँड्स यांनी 1980-90 च्या दशकात ऑस्कर नामांकित अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. 'अ रुम विथ अ व्ह्यू' आणि 'लीव्हिंग लास वेगास' हे त्यांचे गाजलेले सिनेमे आहेत. गिर्यारोहण करताना ज्युलियन गायब झाले होते. आता पाच महिन्यांनी दक्षिण कॅलिफोर्नियाच्या एका डोंगरावर ते मृतावस्थेत आढळून आले आहेत. ज्युलियन सँड्स यांनी वयाच्या 65 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे.
नेमकं प्रकरण काय?
अभिनेते ज्युलियन सँड्स कॅलिफोर्निया येथील सॅन गॅब्रिअल पर्वताच्या बाल्डी बाऊल भागात गिर्यारोहणासाठी एकटेच गेले असून ते पुन्हा परतलेच नाहीत. पाच महिन्यांपासून ते बेपत्ता होते. 13 जानेवारीपासून बेपत्ता असलेले ज्युलियन सँड्स 25 जून 2023 रोजी एका कॅलिफोर्नियातील एका डोंगरावर ते मृतावस्थेत आढळून आले आहेत. दक्षिण कॅलिफोर्नियाच्या डोंगरावर त्यांचे अवशेष सापडले आहेत. ज्युलियन सँड्स यांचा मृत्यू कसा झाला याचा शोध सध्या सुरू आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, बाल्डी पर्वतारांगेतील एक भाग पर्यटकांची नेहमीच पहिली पसंती असतो. पण जानेवारी महिन्यात हिमवृष्टीमुळे अनेक पर्यटक अडकले होते. यात सँड्सही अडकला होता, असे म्हटले जात आहे. हवामान विभागाने सँड्सचा शोध घेतला असून त्यांच्या कुटुंबियांनी विभागाचे आभार मानले आहेत.
ज्युलियन सँड्स यांचा सिनेप्रवास... (Julian Sands Movies)
ज्युलियन सँड्स यांनी सिनेमांसह छोटा पडदादेखील गाजवला आहे. ज्युलियन हा मुळचा लंडनचा असून 1985 साली 'ए रुम विद अ व्हू' या सिनेमाच्या माध्यमातून त्यांनी मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं. त्यांचा पहिलाच सिनेमा सुपरहिट ठरला होता. बॉक्स ऑफिसवरदेखील या सिनेमाने चांगली कमाई केली. या सिनेमाच्या यशानंतर ते हॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी कॅलिफोर्नियाला गेले.
ज्युलियन सँड्स यांनी हॉलिवूडच्या अनेक सिनेमांत आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. 1989 मध्ये वॉरलॉक, 1990 साली अर्चनोफोबिया, 1991 साली नेकेड लंच, 1993 साली बॉक्सिंग हेलेना आणि 1995 साली लीविंग लास वेबास या सिनेमांमध्ये ते महत्त्वाच्या भूमिकेत झळकले आहेत.
संबंधित बातम्या