Laapataa Ladies Entry In Oscar Awards 2025: फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया (FFI) ने अधिकृतपणे आमिर खान निर्मित आणि किरण राव दिग्दर्शित 'लपता लेडीज' (Laapataa Ladies) या चित्रपटाची ऑस्कर 2025 साठी निवड केली आहे. त्यानंतर किरण राव आणि टीमचं भरभरुन कौतुक करण्यात येत आहे. तसेच किरण रावनेही (Kiran Rao) याविषयी प्रतिक्रिया देत आभार मानले आहेत. 


 ऑस्कर 2025 मध्ये लापता लेडीजच्या एन्ट्रीवर नेटकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. मात्र, सोशल मीडियावरील काही यूजर्सनी भारतीय फिल्म फेडरेशनच्या या निर्णयाला विरोध करत असल्याचं चित्र आहे. तसेच ऑस्करसाठी चित्रपट पाठवण्याच्या निवड प्रक्रियेवरही नेटकऱ्यांनी प्रश्न उपस्थित केले असल्याचं पाहायला मिळालं आहे. 


13 सदस्यांच्या निवड समितीने केली लापता लेडीजची निवड


आमिर खान आणि किरण राव यांच्या या चित्रपटात रवी किशन, छाया कदम, स्पर्श श्रीवास्तव, नितांशी गोयल आणि प्रतिभा रंता यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.जाह्नू बरुआ (आसाम दिग्दर्शक) यांच्या अध्यक्षतेखालील 13 सदस्यीय निवड समितीने या चित्रपटाची ऑस्कर 2025 साठी निवड केली होती. पण नेटकरी मात्र या निवड प्रक्रियेवर खूश नसल्याचं पाहायला मिळतंय. त्याचप्रमाणे नेटकऱ्यांनी  फिल्म फेडरेशन ऑफ इंडियालाही ट्रोल केलं आहे.  


नेटिझन्सचे निवड प्रक्रियेवर प्रश्न


एका युजरने यावर प्रश्न उपस्थित करत म्हटलं की, 'ऑल वी इमॅजिन अॅज लाईट' सिनेमाला न निवडण्याचा मुर्खपणाचा निर्णय...कान्स ग्रँड प्रिक्स जिंकणारा, आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळविलेल्या  आणि आधीच मोठ्या प्रमाणावर प्रशंसा केलेला चित्रपट. दुसऱ्या एका युजरने कमेंट करत म्हटलं की, 'भारतीय ऑस्कर ज्युरीने आपला मूर्खपणा सुरू ठेवला आणि पायल कपाडियाच्या ऑल वी इमॅजिन अॅज लाईट सिनेमाऐवजी लापता लेडीजची निवड केली. आणखी एका युजरने म्हटलं की, मला लापता लेडीज हा सिनेमा खूप आवडला आहे. पण #AllWeImagineAsLight कडे दुर्लक्ष करून, FFI ने यावेळी आणखी एक ऑस्कर पुरस्कार गमावला आहे.   














ही बातमी वाचा : 


Sangram Chougule : 'ज्या कामासाठी मी आतमध्ये गेलो होतो...', अरबाज बाहेर आल्यानंतर संग्रामने रुग्णालयातून दिली प्रतिक्रिया