मुंबई : 'फँड्री', 'सैराट'च्या यशानंतर मराठमोळा दिग्दर्शक नागराज मंजुळे आता नव्या सिनेमावर काम करत आहे. पण यावेळी तो कॅमेऱ्यामागे नाही तर कॅमेऱ्यासमोर दिसणार आहे.


होय, दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांच्या 'द सायलेन्स' चित्रपटात नागराज मंजुळे महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. नागराजच्या या सिनेमाचा ट्रेलर आणि पहिलं पोस्टर नुकतंच रिलीज झालं आहे.


या सिनेमात नागराज मंजुळेसोबतच अभिनेत्री अंजली पाटील आणि अभिनेता रघुवीर यादव यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. नुकतंच अंजली पाटीलच्या 'न्यूटन' सिनेमाची ऑस्करसाठी निवड झाली आहे.

सत्य कथेवर आधारित हा सिनेमा येत्या 6 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. सिनेमाची कथा आणि पटकथा अनिता सिधवानीने लिहिली आहे.

इफ्फी, बंगळूरु, मुंबई, पुणे आणि कोलकाताबरोबरच जर्मनी, अमेरिका, ब्राझील, स्पेन, टांझानिया, चेक प्रजासत्ताक आणि बांग्लादेशसारख्या 35 हून अधिक नामांकित चित्रपट महोत्सवांमध्ये या चित्रपटाने हजेरी लावली. एवढंच नाही तर 2 महाराष्ट्र राज्य पुरस्कारांबरोबर एकूण 15 पुरस्कारांवर ‘द सायलेन्स’ने नाव कोरलं आहे.

खरंतर नागराजने यापूर्वी 'फँड्री' तसंच 'सैराट'मध्ये छोट्या भूमिका साकारल्या होता. परंतु 'द सायलेन्स' चित्रपटात तो एक प्रमुख व्यक्तिरेखा साकारणार आहे.


पाहा ट्रेलर





संबंधित बातम्या


नागराज मंजुळे यांची बिग बींवर हिंदी भाषेत फेसबुक पोस्ट


कोणीही जातीने माजू नये आणि लाजूही नये : नागराज मंजुळे


झिंगाट, सैराट, आर्ची-परशा कळले, पण प्रबोधन झालं नाही : नागराज मंजुळे