Mere Desh Ki Dharti : कार्निवल मोशन पिक्चर्सचा 'मेरे देश की धरती'.... देश बदल रहा है' (Mere Desh Ki Dharti) हा हिंदी सिनेमा येत्या 6 मे ला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. 


सादरीकरण आणि मांडणीत वैविध्य असलेला 'मेरे देश की धरती' हा सिनेमा अनेक महोत्सवांमध्ये गौरविला गेला आहे. तरुणाईला रिफ्रेश आणि उमेद देणारा हा सिनेमा अनेक महोत्सवांमध्ये गौरविला गेला असून तरुणाईला रिफ्रेश आणि उमेद देणारा हा सिनेमा प्रत्येकाने आवर्जून पहायला पाहिजे. 


दोन इंजिनिअर्स तरुण स्वत:ची नोकरी करत असताना, काहीतरी वेगळे करून दाखवण्याची उर्मी जपण्यासाठी कसे शेतकरी बनतात, याची हलकीफुलकी रंजक कथा 'मेरे देश की धरती' या सिनेमातून उलगडणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन फराझ हैदर यांनी केलं आहे. मिर्झापूर फेम दिव्यांदू शर्मा, अनुप्रिया गोएंका आणि अनंत विधात या आघाडीच्या कलाकारांसोबत ईंनाम्युलहक, ब्रिजेंद्र काला, राजेश शर्मा, अतुल श्रीवास्तव, फारुख झफर या प्रतिभावान कलाकारांच्या सुद्धा या सिनेमात महत्त्वाच्या भूमिका आहेत.






'मेरे देश की धरती' या सिनेमाच्या माध्यमातून शहरी आणि ग्रामीण भागातील वास्तव परिस्थितीवर भाष्य करण्यात आले आहे. या सिनेमाची संकल्पना डॉ. श्रीकांत भासी यांची आहे. संवाद पियुष मिश्रा यांनी लिहिले आहेत. सिनेमाला साजेसं संगीत विक्रम मॉण्टेरोज यांनी दिले असून छायांकन हरी वेदांतम यांचे आहे.


संबंधित बातम्या


Sher Shivraj : पहिल्याच दिवशी 'शेर शिवराज' हाऊसफुल! सिनेमागृहांत घुमतोय ‘जय शिवराय’चा जयघोष


Jersey Box Office Collection Day 1 : शाहिद कपूरच्या 'जर्सी'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, पहिल्या दिवशी केली चार कोटींची कमाई


Bhool Bhulaiyaa 2 : कार्तिक आर्यनच्या 'भूल भुलैया 2'चे नवे पोस्टर प्रदर्शित, 'या' दिवशी सिनेमा होणार रिलीज