Jersey Box Office Collection Day 1 : बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरचा (Shahid Kapoor) 'जर्सी' (Jersey) सिनेमा नुकताच सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. पहिल्याच दिवशी या सिनेमाने चार कोटींची कमाई केली आहे.
'जर्सी' सिनेमात शाहिद कपूर, मृणाल ठाकूर (Mrunal Thakur) मुख्य भूमिकेत आहेत. रिलीजच्या पहिल्या दिवशी या सिनेमाने चार कोटींची कमाई केली आहे. वीकेंडला हा सिनेमा आणखी कमाई करू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. 'जर्सी' सिनेमाचे दिग्दर्शन गौतम तिन्ननुरीने केले आहे. प्रेक्षक गेले अनेक दिवस या सिनेमाची प्रतीक्षा करत होते.
रिलीज डेट पुढे ढकलल्याचा सिनेमाला फायदा
शाहिद कपूरचा 'जर्सी' सिनेमा आधी 14 एप्रिलला प्रदर्शित होणार होता. पण 'केजीएफ 2' सिनेमादेखील 14 एप्रिलला प्रदर्शित होणार असल्याने 'जर्सी'च्या निर्मात्यांनी या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. 'जर्सी' हा 2019 साली प्रदर्शित झालेल्या एका तेलुगू सिनेमाचा हिंदी रीमेक आहे. सिनेमात शाहिद क्रिकेटरच्या भूमिकेत आहे.
संबंधित बातम्या