Shah Rukh Khan House Mannat : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या (Shah Rukh) 'मन्नत' (Mannat) या बंगल्याची नेम प्लेट नुकतीच बदलण्यात आली आहे. शाहरुख खानच्या बंगल्याच्या नवीन नेम प्लेटचे फोटो सोशल मीडियावर ट्रेंड होत आहेत.
शाहरुख खानने आता 'मन्नत' बाहेर खास स्टायलिश नेम प्लेट लावली आहे. शाहरुख खानच्या बंगल्याबाहेर आधी फक्त 'मन्नत' असे लिहिले होते. आता नव्या नेमप्लेटमध्येदेखील 'मन्नत' असेच लिहिले आहे. पण यावेळी 'मन्नत' असे वरपासून खालपर्यंत उभ्या स्थितीत लिहिले आहे.
किंग खान लवकरच करणार कमबॅक
शाहरुखने त्याच्या आगामी सिनेमांची घोषणा केली आहे. सोशल मीडियावर त्याने त्याच्या आगामी 'डंकी' सिनेमाची घोषणा केली होती. या सिनेमाचे दिग्दर्शन राजकुमार हिरानी करणार आहेत. हा सिनेमा 22 डिसेंबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत.
संबंधित बातम्या