Vishu : 'विशू' (vishu) हा कौटुंबिक सिनेमा 8 एप्रिल रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मयूर शिंदे यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन आणि लेखन केले आहे.  गश्मीर महाजनी (gashmeer mahajani) आणि मृण्मयी गोडबोले (Mrinmayee Godbole)  प्रथमच या सिनेमाच्या निमित्ताने एकत्र पडद्यावर झळकणार आहेत. 


ट्रेलरमध्ये शहरात राहून, स्वछंदी, बिनधास्त आयुष्य जगणाऱ्या 'विशू'च्या मनात आपल्या गावाविषयी असलेले प्रेम दिसून येत आहे. स्वतःचे आयुष्य स्वतःच्या पद्धतीने जगण्याची जबाबदारी असणारा विशू डोक्याने नाही तर मनाने विचार करणारा आहे. मात्र त्याच्या आयुष्यात आरवीच्या येण्याने त्याचे संपूर्ण आयुष्य बदलून जाते.  


विशूच्या अस्थिरतेला 'ती'चा किनारा मिळेल? 'विशू' नक्की कोण आहे ? आजवर लपलेले सत्य 'विशू'ला कळणार? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना 'विशू' सिनेमा पाहिल्यावर मिळणार आहेत. शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही जीवनशैलींचे दर्शन 'विशू'मध्ये घडत आहे.





काँक्रीटच्या जंगलात माणूसपण हरवलेले लोक आणि गावात आजही माणुसकी  जपणारे, मनापासून पाहुणचार करणारे लोक दिसत आहेत. निळाशार समुद्रकिनारा, नारळी पोफळीच्या बागा आणि तिथली डौलदार घरे असे कोकणातील निसर्गसौंदर्य आणि कर्णमधुर वाटणारी मालवणी भाषा 'विशू'सिनेमात पाहायला मिळणार आहे.


संबंधित बातम्या


Beast Release Date : विजय थलापतीचा 'बीस्ट' सिनेमा 'या' दिवशी होणार प्रदर्शित


Godavari : कॅनडा, न्यूझीलंड, गोवा, पुणे नंतर 'गोदावरी' आता न्यूयॅार्कमध्ये झळकणार!


Rang Majha Vegla : दीपिकाला कळणार अनाथ असल्याचं सत्य, दीपाला होणार अटक! ‘रंग माझा वेगळा’ मालिकेत येणार मोठं वळण!


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha