जबरदस्त संवाद ही सरकार 3 ची जमेची बाजू म्हणावी लागेल. विशेष म्हणजे काही वेळा अमिताभ बच्चन मराठीतही संवाद म्हणताना दिसतील. जेव्हा सिंह घायाळ होतो, तेव्हा तो आणखी भयावह होतो, ही या चित्रपटाची थीम आहे. पहिल्या दोन भागांपेक्षा हा स्वतंत्र असेल, अशी माहिती राम गोपाल वर्मांनी दिली.
अमिताभ बच्चन, रोहिणी हट्टंगडी, रामगोपाल वर्मा, यामी गौतम, अमित साध, जॅकी श्रॉफ यांच्या उपस्थितीत सरकार 3 चा ट्रेलर लाँच करण्यात आला. यामी गौतम चित्रपटात खलनायिका साकारत असल्याच्या चर्चांना रामूने पूर्णविराम दिला. 'सरकार 3' मधील प्रत्येक व्यक्तिरेखा ही ग्रे शेड आहे. हा सिनेमा 7 एप्रिलला रिलीज होणार आहे.