'टोटल धमाल'चे पहिले पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आहे. माधुरी दीक्षित, अजय देवगण, अनिल कपूर, रितेश देशमुख, जावेद जाफरी, जॉनी लिव्हर, अर्शद वारसी अशी मोठी स्टारकास्ट या चित्रपटाच्या दोन्ही पोस्टर्समध्ये पाहायला मिळत आहे.
'धमाल'च्या फ्रॅन्चायझीमधील पहिल्या दोन चित्रपटांमध्ये संजय दत्त प्रमुख भूमिकेत होता. परंतु या फ्रॅन्चायझीच्या तिसऱ्या भागातून संजय द्त्तला वगळण्यात आले आहे. त्याच्याऐवजी या चित्रपटात अभिनेता अजय देवगण, अभिनेता अनिल कपूर आणि धक धक गर्ल माधुरी दीक्षित या तिघांची वर्णी लागली आहे.
'टोटल धमाल'च्या निमत्ताने तब्बल 17 वर्षानंतर माधुरी आणि अनिलची जोडी पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. अनिल-माधुरी जोडीने 'बेटा', 'राम लखन', 'परिंदा' या सुपरहिट चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे.