TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या -


केजीएफ- 2 ची बॉक्स ऑफिसवर जादू


दाक्षिणात्या स्टार यशचा 'केजीएफ चॅप्टर 2' हा चित्रपट काल (15 एप्रिल) रिलीज झाला.  या चित्रपटामध्ये यशसोबतच संजय दत्त , मालविका अविनाश ,श्रीनिधी शेट्टी आणि रवीना टंडन  या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. रिलीज झाल्यानंतर पहिल्याचं दिवशी या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. पहिल्याच दिवशी या सिनेमाने 150 कोटींची कमाई केली आहे. तर हिंदी आवृत्तीने पहिल्याच दिवशी 53.95 कोटी रुपयांची कमाई केली आहे.


आलिया-रणबीरच्या लग्नाचं रिसेप्शन रद्द


अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांचे लग्न झाले आहे. पाच वर्षांच्या नात्याला आलिया-रणबीरने आता लग्नाचे एक नाव दिले आणि त्यांनी त्यांच्या नवीन आयुष्याला आनंदाने सुरुवात केली. त्याचवेळी आता त्यांच्या लग्नाचे रिसेप्शन होणार नसल्याचीही माहिती दिली आहे. या गोष्टीला नीतू कपूरने स्वतः दुजोरा दिला आहे.


'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये 'All That Breathes' या भारतीय माहितीपटाचे होणार विशेष स्क्रीनिंग


कान्स फिल्म फेस्टिव्हल  17 ते 28 मे दरम्यान होणार आहे. यंदाचा फिल्म फेस्टिव्हल खास असणार आहे. भारताच्या 'ऑल दॅट ब्रीथ्स' या माहितीपटाचे विशेष स्क्रीनिंग होणार आहे.


आलियाच्या मंगळसूत्राची डिझाइन आहे खास


आलिया आणि रणबीरच्या रॉयल लूकनं अनेकांचं लक्ष वेधलं. सध्या आलियाच्या मंगळसूत्राची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. आलिच्या मंगळसूत्राची डिझाइन खास आहे. आलियाचं मंगळसूत्र हे सोन्याच्या चैनीनं तयार केलं आहे. तसेच टीयर ड्रॉप शेपमधील डायमंड आणि काळे मोती देखील आलियाच्या मंगळसूत्रामध्ये आहेत. मंगळसूत्राचे पेंडंट इनफिनिटी डिझाइनं तयार करण्यात आलं आहे.


'केजीएफ 2' ओटीटीवर होणार रिलीज


दाक्षिणात्या अभिनेता यशचा  'केजीएफ 2' सिनेमा नुकताच सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. पहिल्याच दिवशी या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. अनेक बिग बजेट सिनेमांचे रेकॉर्ड या सिनेमाने मोडले आहेत. रिपोर्टनुसार, 'केजीएफ 2' हा सिनेमा आता ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. 


'द कश्मीर फाइल्सनंतर आता दिल्ली फाइल्स'


विवेक अग्निहोत्री यांनी नुकतीच एक पोस्ट शेअर  केली. या पोस्टमधून द कश्मीर फाइल्सला दिलेल्या पसंतीबद्दल  प्रेक्षकांचे अभार मानले आणि नव्या चित्रपटाची घोषणा केली.  'द दिल्ली फाइल्स' असे या सिनेमाचे नाव आहे. 


 शंकर महादेवन यांनी एका श्वासात गायले हनुमान चालीसा


प्रसिद्ध गायक, संगीतकार शंकर महादेवन यांनी एकाहून एक खास गाणी रसिकांच्या भेटीला आणली आहेत. रसिकांच्या मनात त्यांनी एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. सध्या शंकर महादेवन यांचा हनुमान चालीसा गातानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


'बाई गं...' लावणीमध्ये अमृताच्या दिलखेच अदा


'चंद्रमुखी'तील 'चंद्रा'ने आपल्या ठसकेबाज लावणीने सर्वांना घायाळ केल्यानंतर आता चित्रपटातील आणखी एक लावणी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. गुरू ठाकूर यांनी शब्दबद्ध केलेल्या 'बाई गं...'ही बैठकीची लावणीला अजय-अतुल यांचं संगीत लाभलं आहे. तर, आर्या आंबेकर हिच्या सुमधूर आवाजाने गाण्याची रंगत वाढवली आहे.


शाळेतल्या 'ती'ची गोष्ट


शाळेतल्या 'त्या' वयात आपल्या प्रत्येकालाच कोणी ना कोणी 'ती' किंवा 'तो' नक्कीच आवडत असतो. अजाण वयातल्या त्या भावना प्रत्येकासाठीच कायमच विशेष राहिलेल्या असतात. हाच धागा पकडत 'ती' आणि शाळा या नव्या वेब सिरीजची घोषणा स्टुडिओ 09 प्रॉडक्शनने नुकतीच सोशल मीडियावर केली आहे.


डॉ. रघुनाथ माशेलकरांनी केले 'मी वसंतराव'चे कौतुक


'मी वसंतराव' हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमाचे सध्या प्रेक्षकांसह समीक्षकांकडून कौतुक होत आहे. अशातच डॉ. रघुनाथ माशेलकरदेखील 'मी वसंतराव' सिनेमा पाहून भारावून गेले आहेत. 'मी वसंतराव' सिनेमा पाहून पुढील 20 वर्षे काम करण्याची ऊर्जा मिळाली. अशी प्रतिक्रिया पद्मविभूषण शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी दिली आहे.