मुंबई : ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने अभिनेत्री दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान, रकुल प्रीत सिंह आणि सिमोन खंबाटा यांच्यासह सात जणांना समन्स बजावले आहे. उद्या (26 सप्टेंबर) दीपिका पदुकोण, सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांची नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो चौकशी करणार आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो त्यांना नेमके कोणते प्रश्न विचारणार या संदर्भातील हा रिपोर्ट.


ड्रग्सबाबत चर्चा करणारी काही व्हॉट्सअ‍ॅप चॅट एजन्सी रडारवर आहे. दीपिक पादुकोणची व्यवस्थापक करिश्मा प्रकाश आणि “डी” यांच्यात हे व्हॉट्सअॅप चॅट झाले आहेत, असं सूत्रांनी सांगितले. अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या मृत्यूच्या अंमली पदार्थांच्या कनेक्शननंतर बॉलिवूडमधील अनेक मंडळींची नावं यात समोर आली आहेत.


दीपिकाला काय प्रश्न विचारले जाणार?


1) करिश्मा प्रकाशची चॅट केलं होतं का?


2) तुम्ही ड्रग्ज घेता का?


3) करिश्माकडून ड्रग्ज मागवले होते?


4) कोको बारमध्ये कोणकोण गेलं होतं?


5) कोको बारमध्ये ड्रग्जचं सेवन केलं का?


6) तुम्ही ड्रग्ज अॅडिक्ट आहात का?


7) एखाद्या ड्रग्ज सप्लायरला ओळखता?


8) कधी एखाद्या पेडलरकडून ड्रग्ज मागवलं?


9) ड्रग्ज वगळता इतर कोणता नशा करता?


10) इंडस्ट्रीमधले ड्रग अॅडिक्ट कोण आहेत?


11) तुम्ही व्हॉट्सॲप ग्रुप त्या एडमिन आहेत का? ज्यात ड्रग्स विषयी चॅट झाले?


सारा अली खान


1) सुशांतशी मैत्री कधी झाली?


2) सुशांतच्या फार्म हाऊस वर कधी पार्टी केली होती.


3) सुशांतशी किती वर्षांपासून ओळख होती? श्रद्धा कपूरला ओळखते का?


4) रिया आणि सुशांत सोबत कधी कुठल्या ड्रग्जच्या पार्टीमध्ये सामील झाली होती का?


5) सुशांत सोबत बँकॉक टूर मध्ये काय झालं होतं आणि कोण कोण त्याच्यासोबत होतं?


6) सुशांत सोबत केदारनाथच्या सेट वर ड्रग्ज घेतले होते का ?


7) रियाने सांगितलं की साराकडून सुशांत आणि रियाने पहिल्यांदा ड्रग्ज मागवले होते. त्यामुळे ती कुठल्या ड्रग्ज पेडलरच्या संपर्कात होती का?


8) बॉलिवूडमध्ये कोण कोण ड्रग्ज घेतं काही माहिती आहे का?


9) पावना डॅम येथील बोट चालकचा स्टेटमेंट साराला ऐकवलं जाणार आणि त्यावर तिला विचारण्यात येणार


10) कुठलं अजून व्यसन आहे का?


11) सारा कुठल्या ड्रग्ज पेडलरच्या संपर्कात होती का? जर होती तर ती संपर्कात कशी आली


12) सुशांत ड्रग्ज घेत होता का? आणि कोण त्याला ड्रग्ज देत होतं?


13) बॉलिवूडमध्ये ज्या पार्ट्या होतात त्या पार्ट्यांमध्ये कधी सारा गेली होती का? तिथे कधी ड्रग्ज घेतले होते का?


14) ड्रग्ज चॅट संदर्भात आणि रियाच्या जबाबा वर सुद्धा साराला विचारण्यात येणार आहे.


15) जया सहा आणि श्रुती मोदीला ओळखते का? कधीपासून ते सुशांतला ड्रग्ज पुरवत होते का?


16) सुशांतच्या स्टाफने जबाब दिला आहे की सारा सुशांतच्या पार्टीमध्ये असायची. त्यावर सुद्धा साराला विचारण्यात येणार आहे.


श्रद्धा कपूर


1) जया सहाला ओळखते का?


2) ड्रग्ज पेडलरच्या संपर्कात आहे का? आणि कशी आली?


3) सुशांतच्या घरी किंवा फार्महाऊसवर पार्टी केली आहे का?


4) पावना डॅम येथील आयलेंड वर कधी ड्रग्ज पार्टीला गेली होती?


5) कधी ड्रग्जचं सेवन केल आहे का?


6) फिल्म छिछोरेच्या वेळी कधी ड्रग्जचं सेवन केल आहे का


7) सुशांतशी मैत्री कधी झाली?


8) जगदीशने जबाब दिला आहे की श्रद्धा सुद्धा ड्रग्जपार्टीमध्ये असायची त्या जबाबाच्या आधारित प्रश्न विचारण्यात येणार. काय झालं होतं? कोण कोण होतं पार्टीमध्ये?


9) सुशांत ड्रग्ज घेत होत का? कोण आणून देत होतं?


10) बॉलीवूड मधील ड्रग्ज कनेक्शन संदर्भात प्रश्न असतील?


Deepika Padukone | उद्या NCB दीपिका, सारासह श्रद्धा कपूरवर प्रश्नांची सरबत्ती करणार?