krishnam Raju : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते कृष्णम राजू (krishnam Raju) यांचे निधन झाले आहे. कृष्णम राजू यांनी वयाच्या 83 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. टॉलिवूडचे 'रिबेल स्टार' अशी कृष्णम राजू यांची ओळख होती. त्यांनी 180 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. राधे श्याम हा त्यांचा शेवटचा चित्रपट. कृष्णम राजू यांनी सामाजिक, कौटुंबिक, रोमँटिक, थ्रिलर कथानकावर आधारित असणाऱ्या चित्रपटांमध्ये काम केले.
1996 मध्ये रिलीज झालेल्या 'चिलाका गोरनिका' या चित्रपटामधून कृष्णम राजू यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. कृष्णम राजू हे आंध्र प्रदेश सरकारच्या नंदी पुरस्काराचे दोन वेळा मानकरी ठरले. कृष्णम राजू यांना 1986 मध्ये 'तंद्र पापरायुडू' चित्रपटासाठी फिल्मफेअरच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. 2006 मध्ये त्यांना फिल्मफेअर साऊथचा 'लाइफटाइम अचिव्हमेंट' पुरस्कार मिळाला. त्यांच्या 'अमरा दीपम', 'सीता रामुलू', 'कटकटला रुद्रैया' या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.
अभिनेता निखिल सिद्धार्थनं ट्वीट शेअर करुन कृष्णम राजू यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच कृष्णम राजू यांच्या चाहत्यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या आहेत.
कृष्णम राजू यांनी 1991 मध्ये नरसापुरममधून काँग्रेसचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. 1999 च्या निवडणुकीत त्यांनी भाजप उमेदवार म्हणून त्यांनी विजय मिळवला.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या :