अक्षयने आपल्या चाहत्यांना ऑनलाईन लीक झालेला चित्रपट न पाहण्याची विनंती केली आहे. पायरसीला आळा घालण्यासाठी याविरोधात लढा देण्याचं आवाहन अक्षयने केलं आहे. काही चाहत्यांनी ही गोष्ट निदर्शनास आणल्यानंतर कोरिओग्राफर रेमो डिसुझाने चित्रपटाच्या निर्मात्यांना याविषयी माहिती दिली.
अक्षय कुमारने ट्वीट करुन फॅन्सना पाठिंबा देण्यास सांगितलं आहे.
https://twitter.com/akshaykumar/status/888410052654096384
टॉयलेट एक प्रेमकथामध्ये अक्षयसोबत भूमी पेडणेकर असून सिनेमा 11 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.
अक्षयकुमारच्या 'टॉयलेट- एक प्रेमकथा' या चित्रपटातून स्वच्छ भारत अभियानाला पाठिंबा देण्यात आला आहे. यातून प्रत्येक घरात शौचालय असण्याचं महत्त्व अधोरेखित करण्यात आलं आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अक्षयचं कौतुक केलं होतं.