'मानिनी' या शॉर्टफिल्मच्या निर्मात्यांनी 'टॉयलेट एक प्रेमकथा' सिनेमाची कथा चोरल्याचा आरोप आहे. त्यातच प्रसिद्ध अभिनेत्री अस्मिती शर्माने अक्षय कुमारच्या सिनेमाची कथा आपल्या 'गुटरु-गुटर-गूं'मधून चोरल्याचा दावा केला आहे.
एबीपी न्यूजशी बोलताना अस्मिता शर्मा म्हणाली की, 'गुटरु-गुटर-गूं' हा सिनेमा 28 जुलै रोजीच प्रदर्शित होणार होता. पण सिनेमा वितरकांनी या सिनेमाची कथा अक्षय कुमारच्या 'टॉयलेट एक प्रेमकथा' सारखीच असल्याने वितरणास नकार दिला. तसेच अक्षय कुमारचा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतरच तिने आपला सिनेमा प्रदर्शित करावा, अशी ताकीद दिल्याचा दावा केला आहे.
विशेष म्हणजे, तिच्या सिनेमाला सेंसॉर बोर्डानं 2015 मध्येच प्रमाणित केल्याचाही दावा अस्मिताने एबीपी न्यूजला सांगितलंय. त्यामुळे अस्मिताचा सिनेमा 28 जुलै रोजी प्रदर्शित होण्यास अडथळे आणल्याबद्दल तिने आता न्यायालयात धाव घेतली आहे. तिने निर्मात्यांविरोधात जयपूर न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
अस्मिताने या आधी 'प्रतिग्या', 'बालिका वधू', 'ना आना इस देस लाडो'सारख्या मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती. 'गुटरु-गुटर-गूं'चे दिग्दर्शन अस्मिताचे पती प्रतीक शर्मा यांनी केलं आहे.
संबंधित बातम्या