मुंबई : 'बाहुबली 2' सिनेमातील कलाकार सिनेमा रिलीज झाल्यापासून कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत आहेतच. सिनेमातील अभिनेता बाहुबली अर्थात प्रभासच्या लग्नाची चर्चा थांबत नाही तोवरच त्याच्या नव्या लूकची चर्चा सध्या रंगली आहे.
'बाहुबली 2' च्या दमदार यशानंतर प्रभास अमेरिकेत सुट्ट्या एन्जॉय करत आहे. मात्र त्याचा अमेरिकेतील लूक व्हायरल झाला आहे.
अमेरिकेतून परतताच प्रभास त्याचा अपकमिंग सिनेमा 'साहो'ची शूटिंग सुरु करणार आहे. या सिनेमाचं बजेट 150 कोटी आहे. या सिनेमातील अभिनेत्रीच्या नावाविषयी अजूनही सस्पेन्स कायम आहे. अभिनेत्री कतरिना कैफ, श्रद्धा कपूर, दिशा पटाणी आणि अनुष्का शेट्टी यांच्या नावाची चर्चा सुरु आहे.