World Theatre Day 2022 : नाट्यवर्तुळात 'जागतिक रंगभूमी दिन' (World Theatre Day) मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गेल्यावर्षी हा दिवस कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे तिसऱ्या घंटेविनाच साजरा झाला. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने रंगकर्मींनी पुन्हा एकदा कंबर कसली आहे. जागतिक रंगभूमी दिनानिमित्त 'हरवलेल्या पत्त्यांचा बंगला' ते 'सारखं काहीतरी होतंय' अशा अनेक नाटकांचे प्रयोग रंगणार आहेत. 


जागतिक रंगभूमीदिनानिमित्त जाणून घ्या कोणत्या नाट्यगृहात कोणत्या नाटकाचा प्रयोग रंगेल.  


- वासूची सासू - दामोदर हॉल (परळ) - दुपारी 4.30 वा.
- अ परफेक्ट मर्डर - कालिदास (नाशिक) - सायंकाळी 5.30 वा.
- सारखं काहीतरी होतंय -  सावित्रीबाई फुले (डोंबिवली) - दुपारी 4 वा. आणि सायंकाळी 7.30 वा.
- हरवलेल्या पत्त्यांचा बंगला - क्रां. फडके (पनवेल) - दुपारी 4.30 वा.
- मराठी बाणा - विष्णुदास भावे (वाशी) - दुपारी 4 वा.
- हीच तर फॅमिलीची गंमत आहे - गडकरी रंगायतन (ठाणे) - सकाळी 11.30 वा, कालिदास नाट्यमंदिर (मुलुंड) - दुपारी 4.30 वा.
- मी स्वरा आणि ते दोघं - दीनानाथ नाट्यगृह (पार्ले) - दुपारी 4 वा.
- खरं खरं सांग - दीनानाथ नाट्यगृह (पार्ले) सकाळी 11 वा. 


'जागतिक रंगभूमी दिना' संदर्भात
27 मार्च हा दिवस दरवर्षी 'जागतिक रंगभूमी दिन' म्हणून साजरा केला जातो. 1961 'युनेस्को'च्या इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिटय़ूटने या दिवसाची सुरुवात केली होती. पहिला 'जागतिक रंगभूमी दिन' 1962 मध्ये साजरा झाला. त्यानंतर नाट्यवर्तुळात दरवर्षी हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यानिमित्ताने जगभरातील नाट्य जगतातील महत्त्वाची एक व्यक्ती संदेश देते. हा युनेस्कोच्या जागतिक रंगभूमी दिनाचा महत्त्वाचा भाग आहे. 1962 साली ज्यो कॉक्चू यांना संदेश देण्याचा पहिला मान मिळाला होता.


संबंधित बातम्या


World Theatre Day 2022 : 27 मार्चला साजरा होणाऱ्या जागतिक रंगभूमी दिनाविषयी थोडक्यात...


ABP Ideas of India: आता बॉलीवूड, टॉलीवूड हे शब्द वापरण्याऐवजी 'इंडियन फिल्म इंडस्ट्री' म्हणावं: करण जोहर


Bollywood Movies : 'गंगूबाई काठियावाडी' ते 'बच्चन पांडे', नवीन वर्षात 'या' सिनेमांचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ!


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha